महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ पुणे तर्फे महेश भारंबे यांचा कार्याचा गौरव इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) - कुंभारखेडा त...
महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ पुणे तर्फे महेश भारंबे यांचा कार्याचा गौरव
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
- कुंभारखेडा तालुका रावेर येथील मूळ रहिवासी (हल्ली मुक्काम कल्याण) महेश गोपाळ भारंबे यांचा महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ आणि लेवा चेंबरं ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज पुणे यांच्याकडून फिल्म इंडस्ट्री सारख्या क्षेत्रात वेगळ्या ठिकाणी जाऊन विशेष काम केले म्हणून स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
आपण फिल्मी दुनियेत कार्यरत आहात. आपण लगेच विशिष्ट ध्येय मनाशी बांधून आले. त्यानंतर आपण कार्यकारी निर्माता म्हणून अनेकविध चित्रपटांची निर्मिती केली. त्यात प्रामुख्याने गस्त, समसारा, राव रंभा, सत्यशोधक, उर्मी, एक होतं माळीन, हॅश टॅग प्रेम , बेनवड , लागिर प्रेमच अशा १५ पेक्षा जास्त चित्रपटांच्या निर्मितीत आपण कार्यकारी निर्माता ( Executive producer) म्हणून आपण काम केले आहे.
आपण मराठी व हिंदी दोन्ही चित्रपट सृष्टीशी नाळ जडवून आहात. आपल्या कामाची पद्धात, आपल्या वैविध्यपूर्ण कलागुणांची झलक, आपल्या कार्यातील सातत्य याची दखल झी सिनेमा ने घेतली आणि आपल्याला झी सारख्या मोठा चॅनेल ने निर्माता म्हणून चार चित्रपटांसाठी संधी दिली आहे आणि आता आपण मराठी सोबत हिंदी आणि साऊथ इंडस्ट्री मध्ये ही आपल्या उज्ज्वल भविष्याची कहाणी लिहिणारी उल्लेखनीय बाब आहे.
चंदेरी दुनियेची स्वप्न बहुतेक जण पहात असतात, परंतु अभिनयापलीकडे जाऊन डोकावल्यास अनेकविध संधी आहेत...आपण अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्षेत्रात कार्य करीत आहात, लेवा पाटीदार समाजाला आपला सार्थ अभिमान आहे. याप्रसंगी महाराष्ट्र महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले, सचिव दिलीप नाफडे व कोषाध्यक्ष डॉ. मिलिंद पाटील, एल सी सी आय ए चे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र पाटील, सचिव डॉ. पवन भोळे ,इंदाला समूहाच्या चेअरमन सौ जयश्री महाजन, संस्थापक अध्यक्ष डॉ. विजय महाजन उपस्थित होते.

No comments