राहुल अतिर्गे यांनी कोकरूड पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला, तर स.पो.नि. जयवंत जाधव नेहमीच प्रयत्नशील राहिले प्रियांका देशमुख ( सांगली जिल्...
राहुल अतिर्गे यांनी कोकरूड पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला, तर स.पो.नि. जयवंत जाधव नेहमीच प्रयत्नशील राहिले
प्रियांका देशमुख ( सांगली जिल्हा ) प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सांगली जिल्हा पोलीस दलातील महत्वांचे पोलीस ठाणे म्हणून ओळखले जाणारे कोकरूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव यांची पदोन्नतीने पोलीस निरीक्षक म्हणून मुंबई येथे नियुक्ती झाल्यामुळे कोकरूड पोलीस ठाण्याच्या रिक्त जागेवर सांगली जिल्हा पोलीस दलात विविध पोलीस ठाण्यात उत्कृंष्ट सेवा देणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिर्गे यांनी कोकरूड पोलीस ठाण्याचा पदभार माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर मॅडम यांच्या आदेशावरून पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव यांनी कोकरूड पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले, यावेळी नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक पदभार घेताच कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, असे त्यांनी कोकरूड पोलीस ठाण्याच्या परिसरांतील जनतेला आव्हान केले आहे. त्यामुळे सर्वांनीच कायद्याचे पालन करून पोलीस प्रशासनालाही सहकार्य करावे आपल्यासमवेत कायम पोलीस प्रशासन असणार आहे. कोणतीही तक्रार असेल तर थेट माझ्याशी संपर्क साधावा असेही आव्हान नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी केले आहे.

No comments