खरवळ वारसविहीर बस आठ महिन्यापासून बंद प्रवाशांचे हाल जयवंत हागोटे त्रंबकेश्वर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) त्र्यंबकेश्वर :- तालुक्यातील खर...
खरवळ वारसविहीर बस आठ महिन्यापासून बंद प्रवाशांचे हाल
जयवंत हागोटे त्रंबकेश्वर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
त्र्यंबकेश्वर :- तालुक्यातील खरवळ वारस विहीर एसटी बस गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून बंद असल्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांचे व शालेय विद्यार्थ्यांचे गैरसोय होत असून एसटी महामंडळाने लवकर एसटी बस सुरू करावी अशी मागणी पूर्व विभागातील हेदुलीपाडा,नांदगाव कोहोळी, वारसविहीर,खरवळ येथील नागरिकांनी केली आहे.
हेदुलीपाडा,नांदगाव कोहोळी, वारसविहीर, खरवळ मार्गे एसटी बस सेवा बंद असल्यामुळे नागरिकांची तसेच विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी अडचणी येत आहेत शालेय विद्यार्थ्यांना पायपीट करून व मिळेल त्या खाजगी वाहनाने त्र्यंबकेश्वर येथे शिक्षण घेण्यासाठी यावे लागत आहे तसेच जेष्ठ नागरिकांना कामानिमित्त त्रंबकेश्वर प्रवास करावा लागत आहे एसटी बस नसल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तसेच आजारी गरीब रुग्णांना खाजगी व सरकारी दवाखान्यात वेळेत पोहोचता येत नाही शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे बी-बियाणे, खते,औषधे खरेदी करण्यासाठी व बँकेत कामानिमित्त त्र्यंबकेश्वर बाजारपेठेत यावे लागत आहे.
वेळुंजे ते खरवळ रस्त्याचे काम सुरू होते व रस्ता खराब आहे हे कारण सांगून महामंडळाने एसटी बसेस बंद केल्या होत्या आठ ते नऊ महिन्यापासून त्रंबकेश्वर वारसविहीर बस बंद आहे. परंतु आता रस्त्याचे काम पूर्ण होऊन चार महिने झाले तरी एसटी बस सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांची व शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्र्यंबकेश्वर ते खरवळ, वारसविहीर एसटी बस लवकरात लवकर सुरू करावी. विद्यार्थी व नागरिक मागणी करत आहेत. जर पाच दिवसात बस सेवा चालू झाली नाही तर आंबोली फाटा येथे रस्ता रोको करण्यात येणार आहे.
प्रतिक्रिया
वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही एसटी महामंडळाचे अधिकारी रस्ता खराब आहे रस्त्याचे काम चालू आहे असे कारण सांगतात पण आता रस्ता होऊन चार महिने झालेले आहेत तरी बस सेवा चालू झालेली नाही शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांना मोठे गैरसोय होत आहे त्यामुळे खाजगी गाड्यांमधून प्रवास करावा लागत आहे. खाजगी वाहन नसल्यावर पायी पायी प्रवास करावा लागतो आता दोन दिवसांवर दिवाळी आली आहे दिवाळीची खरेदी करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत आहे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे पाच दिवसात बस सेवा चालू झाली नाही तर जन आक्रोश मोर्चा चेढण्यात येईल.
बुधा ढोरे
सामाजिक कार्यकर्ता

No comments