प्रत्येक माता-पित्याने आपल्या मुलांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श रुजवावा...यशपाल बोरे लातूर जि.प्र. (उत्तम माने) (संपादक -:- हेमका...
प्रत्येक माता-पित्याने आपल्या मुलांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श रुजवावा...यशपाल बोरे
लातूर जि.प्र. (उत्तम माने)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
समाजातील समानता, न्याय आणि स्वाभिमान या मूल्यांची खरी जोपासना घराघरातून सुरू होते. त्यामुळे प्रत्येक माता-पित्याने आपल्या मुलांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार रुजवावे. “मुलांमध्ये समता, मानवता, समाजसेवा व निर्णयक्षमतेची वृत्ती निर्माण झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांचा आदर्श मुलांच्या जीवनात प्रत्यक्ष दिसला पाहिजे,” असे मत भीम आर्मी भारत एकता मिशनचे राष्ट्रीय सचिव यशपाल बोरे यांनी व्यक्त केले.
ते मौजे चांदोरी तालुका निलंगा जिल्हा लातूर येथे भीम आर्मी भारत एकता मिशन शाखा उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी मराठवाडा निरीक्षक तथा महाराष्ट्र प्रदेश संघटक अक्षय धावारे माजी मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे,जिल्हा अध्यक्ष विलास चक्रे,जिल्हा उपाध्यक्ष विशाल पोटभरे,जिल्हा सचिव बबलू शिंदे, निलंगा तालुकाध्यक्ष अतुल सोनकांबळे, तालुका उपाध्यक्ष.
राज लोखंडे, अनिल कांबळे,तालुका महासचिव किशोर सुरवसे , सचिव
बालाजी सुरवसे,तालुका सचिव दिगंबर सूर्यवंशी,तालुका उपाध्यक्ष अनिल सुरवसे ,
प्रथमेश सूर्यवंशी,अर्जुन जाधव रोहित माने मनोज कांबळे,बालाजी सोनटक्के आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना यशवंत बोरे पुढे म्हणाले की,मुलांना फक्त शिक्षण देणे पुरेसे नाही; मुलांना समाजकार्य, नैतिकता आणि स्वावलंबी जीवनाचे मूल्य शिकवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. “जर प्रत्येक कुटुंब आपल्या मुलांमध्ये डॉ. बाबासाहेबांचा आदर्श रुजवेल, तर भविष्यात आपण एक प्रगत, न्यायपूर्ण आणि समानतावादी समाज उभा करू शकू.” तरुण आणि प्रौढ नागरिकांनी एकमताने डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे जीवनात पालन करणे गरजेचे आहेu. घरा- घरातूनच मुलांमध्ये सकारात्मक मूल्यांची पेरणी केली तर समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी पायाभरणी होईल असेही ते यावेळी म्हणाले...


No comments