adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी ए.पी.आय.रामेश्वर मोताळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

 फैजपूर म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी ए.पी.आय.रामेश्वर मोताळे यांचे विद्यार्थ्यांन...

 फैजपूर म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

ए.पी.आय.रामेश्वर मोताळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन 


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

१५ ऑक्टोबर या दिवशी वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने फैजपूर पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे साहेब यांनी सायबर सुरक्षा यावर मार्गदर्शन केले. कोणत्याही अनोळखी व्यक्तीची फेसबुक, इंस्टाग्राम या सारख्या सोशियल अँप वरून फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये किंवा आपली माहिती शेअर करू नये, तसेच कोणत्याही प्रकारचा ओटीपी कोणालाही सांगू नये १५ ऑक्टोबर या दिवशी वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने शाळेतील उपशिक्षक श्री एन पी पाटील सर यांनी डॉ कलाम यांच्या जीवन चरित्रावर माहिती सांगितली तसेच पुस्तक वाचनाचे फायदे सांगताना मोबाईल आणि पुस्तक यांतील फरक म्हणजे मोबाईल करमणूक करतो तर पुस्तक व्यक्तिमत्व घडविते, मोबाईल माहिती देतो तर पुस्तक ज्ञान देते, अशाप्रकाची माहिती दिली. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या  पुस्तकांचे वाचन करून वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला.

        तसेच फैजपूर पोलीस स्टेशन तर्फे सायबर सुरक्षा या विषयावर शाळेत मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमात सणांच्या दिवसात ऑनलाईन खरेदी करतांना अधिकृत वेबसाइट किंवा अँप वर खरेदी करावी. आपल्या सोबत ऑनलाइन किंवा सायबर फ्रॉड झाल्यास 1930 या टोल फ्री नंबर वर लगेच संपर्क साधावा.

वरील कार्यक्रमांचे श्री एन. पी. पाटील सर यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन श्री ए.एस.नेहते सरांनी केले. सदर कार्यक्रमांमध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री के. टी. तळेले सर, पर्यवेक्षक श्री एस  ओ सराफ  यांचे मार्गदर्शन लाभले. तर शिक्षक श्री व्ही एम भोई सर, श्री टी एम चौधरी सर, श्रीमती वाघुळदे मॅडम, श्रीमती अनिता शिसोदे मॅडम, श्रीमती कल्पना होले मॅडम सर्व सहकारी शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले.

No comments