यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी. महाजन इंग्लिश स्कूल यावल मध्ये दिवाळी हा सण साजरा भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमक...
यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी. महाजन इंग्लिश स्कूल यावल मध्ये दिवाळी हा सण साजरा
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी. महाजन इंग्लिश स्कूल यावल मध्ये दिवाळी हा सण साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रंजना महाजन मॅडम होत्या व इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका श्रीमती दिपाली धांडे मॅडम , पर्यवेक्षिका श्रीमती राजश्री लोखंडे मॅडम व सौ गौरी भिरूड मॅडम उपस्थित होत्या .
या कार्यक्रमाचे सुरुवात सरस्वती पूजन ,गणेश पूजन पूजनाने झाली .
व सुबारस या दिवसाची माहिती इयत्ता दहावीतील विद्यार्थिनींनी तनुश्री अहिरे सांगत असताना गाय वासराची पूजा करण्यात आली .
त्यानंतर धनत्रयोदशी या दिवसाची माहिती चारू फेडगे सांगत असताना आरोग्याची देवता धन्वंतरी यांचे पूजन करण्यात आले .
दिवाळी नरक चतुर्दशी या दिवसाची माहिती योगिनी जावळे या विद्यार्थिनींनी सांगितली .
त्यानंतर लक्ष्मीपूजन दीप प्रज्वलन करण्यात आले लक्ष्मीपूजनाची माहिती गायत्री सरोदे या विद्यार्थिनींनी सांगितली .
तसेच दिवाळीचा शेवटचा दिवस भाऊबीज हा दिवस विद्यार्थी व विद्यार्थिनींनी एकमेकांना ओवाळून साजरा केला याबद्दल माहिती रेश्मा पाटील या विद्यार्थिनींनी सांगितली.
कार्यक्रमाचे शोभा वाढवण्यासाठी सीनियर केजी इंग्लिश व सेमीच्या विद्यार्थिनींनी सुंदर असे नृत्य प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील विद्यार्थिनींनी निधी पाटील, वैष्णवी भंगाळे यांनी केली तसेच आभार प्रदर्शन वैष्णवी नाफडे या विद्यार्थिनींनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले अशाप्रकारे दिवाळी हा सण आनंदाचा दिव्याचा शाळेत उत्साहात पार पडला .

No comments