पुण्यात टीव्ही बंद कर म्हणून मुलाने केला बापाचा खून, कोथरूड पोलिसांनी मुलाला ठोकल्या बेड्या... प्रियांका देशमुख ( पुणे शहर ) प्रतिनिधी. (...
पुण्यात टीव्ही बंद कर म्हणून मुलाने केला बापाचा खून, कोथरूड पोलिसांनी मुलाला ठोकल्या बेड्या...
प्रियांका देशमुख ( पुणे शहर ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
प्रत्येकांच्या घरात दसरा सणाची धामधूम सुरू असताना कोथरूडच्या जय भावानी नगरमध्ये एका मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांचा खून केला आहे. या घटनेमुळे परिसरांत एकच खळबळ उडाली आहे. खून झालेल्या व्यक्तीचे नाव तानाजी पायगुडे असे तर आरोपी मुलगा सचिन तानाजी पायगुडे (वय 33) याला कोथरूड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी तानाजी यांची पत्नी सुमन तानाजी पायगुडे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पायगुडे कुटुंब जय भवानी नगर मधील चाळ क्रमांक दोन मध्ये वास्तव्यास आहे दसऱ्याच्या दिवशी दुपारी बारांशच्या सुमारांस सचिन हा माळ्यावर टीव्ही पाहत बसला होता. यावेळी वडील तानाजी यांनी त्याला टीव्ही बंद कर आणि माझ्या डोळ्यात ड्रॉप टाक असे सांगितलेल्या वरून दोघां बापलेकात चांगलाच वाद निर्माण झाला रागाच्या भरात सचिन याने वडिलांवर स्वयंपाक घरातील चाकूने हल्ला केला. तानाजी यांच्या तोंडावर आणि गळ्यावर वार केले गंभीर जखमी झालेले तानाजी पायगुडे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आरोपी मुलाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सणाच्या दिवशी घराघरात आनंदाचे वातावरण असताना जय भवानी नगर मध्ये घडलेल्या या खूनाच्या घटनेने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

No comments