फैजपूरला शिवकॉलनी मध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दि...
फैजपूरला शिवकॉलनी मध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शिव कॉलनी येथे तथागत भगवान गौतमबुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस समाज सेवक अशोक ईच्छाराम भालेराव साहेब तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक आगळे सर यांचे हस्ते पुष्पहार व दिप प्रज्वलन करून तद नंतर बौद्धाचार्य बी.डी महाले सर यांनी बौद्ध वंदना, त्रिशरण पंचशील घेऊन, उपस्थित सर्वांनी अभिवादन केले. १४ आक्टोबर १९५६ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी.नागपुर येथे लाखो लोकांना बौद्ध धम्माची दिक्षा दिली.अशा या पवित्र दिक्षा भुमीवर तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर हमारे मुक्ती दाता.यांना अभिवादन करण्यात साठी भारतातुन सर्व राज्यातुन तसेच बाहेरील देशातुन लाखो अनुयायी येत असतात. या निमित्ताने धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम साजरा करून
फैजपूर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यां पुतळ्यास पुष्पहार व अभीवादन करण्यासाठी शिवकालीतील संविधान युवक क्रांती चे सर्व पदाधिकारी नितीन इंगळे, धिरज मेंढे अशोकजी भालेराव आगळे सर, निळकंठ भालेराव, शरद तायडे, बाळु भालेराव, गिरिधर इंगळे तसेच आंबेडकर नगर मधिल संतोष मेंढे, सुरेश मेंढे असे अनेक भीम अनुयायी आणि असंख्य अशा महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सर्वश नितीन इंगळे या लहान मुलाने अतीशय सुंदर अशा उद्बोधक डा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरील भाषण केले सर्व उपस्थित महिलांना व पुरुषांनी त्याला बक्षीस देऊन शुभेच्छा दिल्या व गौरव केला. या प्रमाणे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करुन एकमेकांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

No comments