भ्रष्टाचाराविरुद्धची लढा ही केवळ शासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकांची जबाबदारी:- पोलीस अधीक्षक वैष्णवी पाटील ( कोल्हापूर जिल्हा ) प्रतिन...
भ्रष्टाचाराविरुद्धची लढा ही केवळ शासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकांची जबाबदारी:- पोलीस अधीक्षक वैष्णवी पाटील
( कोल्हापूर जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
राज्य शासनांच्या वतीने 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीत दक्षता- आमची सामायिक जबाबदारी या संकल्पनेखाली दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय तसेच ग्राम पातळीवरील सभामधून जनतेपर्यंत पारदर्शकता प्रामाणिकपणा आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाचा संदेश पोहोचवण्याचे उपक्रम सुरू झाले असल्याची माहिती कोल्हापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक वैष्णवी पाटील यांनी दिली असून. कोणत्याही कामासाठी सरकारी अधिकारी, किंवा कर्मचाऱ्यांनी लाच मागितल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्वरित तक्रार नोंदवावी. भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई केवळ शासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे असेही आव्हान पोलीस अधीक्षक वैष्णवी पाटील यांनी केले आहे. सप्ताहाच्या दरम्यान शाळा व महाविद्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी विद्यार्थिनीशी संवाद साधून प्रामाणिकपणाचे महत्व स्पष्ट करणार आहेत. या विविध स्पर्धा व्याख्याने आणि शपथविधी कार्यक्रमांच्या माध्यमांतून तरुण पिढीत प्रामाणिक मूल्याची जोपासना केली जाणार आहे. ग्रामीण भागातही ग्रामसभांच्या माध्यमांतून जनतेला दक्षतेबाबत माहिती देण्यात येणार असून. ग्रामस्थांना भ्रष्टाचाराविरोधी यंत्रणेबाबत जागरूक केले जाणार आहे. दक्षता कार्यालयामार्फत जिल्हाभर विशेष जनजागृती मोहीम राबवून नागरिकांचा सहभाग वाढला जाणार आहे. या उपक्रमांचा उद्देश प्रशासनातील पारदर्शकता वाढवणे भ्रष्टाचार दृढ करणे हा आहे. या जनजागृती सप्ताहाच्या माध्यमांतून शासन आणि नागरिक यांच्यात विश्वासांचे नवे नाते प्रस्थापित होण्यास हातभार लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments