adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

🧯गॅस रिफिलिंगचा धोकादायक धंदा शहरात उघड..! स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

  🧯गॅस रिफिलिंगचा धोकादायक धंदा शहरात उघड..! स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई  सचिन मोकळं अहिल्यानगर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्या...

 🧯गॅस रिफिलिंगचा धोकादायक धंदा शहरात उघड..! स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई 


सचिन मोकळं अहिल्यानगर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर शहरातील नेप्ती नाका परिसरात घरगुती वापराच्या गॅस टाक्या अवैधरित्या वाहनांमध्ये रिफिलिंग करणाऱ्या एका इसमास स्थानिक गुन्हे शाखेने रंगेहात पकडले आहे.या कारवाईत 32,450 रु.किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून,आरोपी विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 गुप्त माहितीवरुन धडक कारवाई

दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. किरणकुमार कबाडी, यांना गुप्त माहिती मिळाली की,नेप्ती नाका ते आयुर्वेद कॉर्नर मार्गावरील बैरागी वॉशिंग सेंटरच्या मागे एका मोकळ्या जागेत एक इसम अवैधरित्या गॅस रिफिलिंगचा धंदा चालवत आहे.या माहितीनुसार पोउपनि दिपक मेढे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार सुनिल पवार,गणेश लबडे, बाळासाहेब नागरगोजे, रमिजराजा आत्तार व अमृत आढाव यांच्या पथकाला घटनास्थळी कारवाईसाठी रवाना करण्यात आले.

घटनास्थळी छापा आणि आरोपीचा अटकेत समावेश

पथकाने तत्काळ नेप्ती नाका परिसरात पोहोचून निरीक्षण केले असता, एक इसम घरगुती गॅस टाक्यांमधून वाहनामध्ये रिफिलिंग करत असल्याचे दिसून आले. पथकाने तातडीने छापा टाकून इसमास ताब्यात घेतले.तपासात त्याचे नाव सतिष आनंद टेकाळे (वय 32,रा.नालेगाव,ता.जि. अहिल्यानगर) असे समोर आले. त्याच्याकडे गॅस विक्री किंवा साठवणीसाठी कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.

धोकादायक प्रकारे गॅस रिफिलिंगचा व्यवसाय

आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गॅस टाक्या बेकायदेशीररित्या बाळगून वाहनांमध्ये गॅस भरत असल्याचे मान्य केले. यामध्ये ज्वलनशील पदार्थ हाताळताना कोणतीही सुरक्षा खबरदारी न घेता नागरिकांच्या जीवितास धोका पोहोचवणारी कारवाई करण्यात येत असल्याचे दिसून आले.

 मुद्देमाल जप्तीची माहिती

पथकाने पंचासमक्ष पंचनामा करून खालील मुद्देमाल जप्त केला:₹10,000 किंमतीची इलेक्ट्रिक मोटार (रिफिलिंगसाठी वापरलेली) ₹4,000 किंमतीचा इलेक्ट्रिक वजन काटा ₹18,450 किंमतीच्या एच.पी., इंडियन आणि भारत गॅस कंपनीच्या 9 रिकाम्या टाक्या एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ₹32,450 रुपये इतकी आहे.

 गुन्हा दाखल – पुढील तपास कोतवाली पोलिसांकडे या प्रकरणी आरोपी सतिष टेकाळे याच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा र.नं. 985/2024 अन्वये भारतीय दंड विधान कलम 125, 287, 288 तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3, 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे.

No comments