शिक्षणतज्ञ सदस्य राजेश्री तेजस पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप... भरत कोळी यावल ता.प्र...
शिक्षणतज्ञ सदस्य राजेश्री तेजस पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप...
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शिरसाड ता.यावल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षणतज्ञ सदस्य व यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे मा.उपसभापती तथा संचालक तेजस धनंजय पाटील यांच्या सुविद्यपत्नी राजेश्री तेजस पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना पेन्सिल, चॉकलेट व दुपारच्या जेवणात गोड शिरा वाटप करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी राजेश्री पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. राजेश्री पाटील या शाळेच्या मा.मुख्याध्यापिका सौ.संगीता पाटील व शिरसाड वि.का.सोसायटीचे संचालक धनंजय पाटील यांच्या सुनबाई आहे. यावेळी शालेय समिती सदस्य, शाळेतील सर्व शिक्षकवृंद, पोषण आहार बचत गटाच्या सर्व सदस्या, सौ.मनिषा नितीन पाटील व गावातील इतर मंडळी उपस्थित होती.

No comments