किसान महाविद्यालयात तंबाखूमुक्त मोहिमेअंतर्गत व्याख्यान छाया:मार्गदर्शन करतांना डॉ. प्रशांत सोनवणे, व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ.जी.एच. सोनव...
किसान महाविद्यालयात तंबाखूमुक्त मोहिमेअंतर्गत व्याख्यान 
छाया:मार्गदर्शन करतांना डॉ. प्रशांत सोनवणे, व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ.जी.एच. सोनवणे आणि प्राध्यापक
पारोळा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पारोळा येथील किसान महाविद्यालयात दि. १० ऑक्टोबर २०२५ रोजी रासेयो एकक आणि कुटीर रूग्णालय पारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखूमुक्त 3.0 मोहीमे अंतर्गत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.जी.एच. सोनवणे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून दंतचिकित्सक डॉ. प्रशांत सोनवणे होते. प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. के. एस. गायकवाड यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मनोगत व्यक्त करतांना डॉ. प्रशांत सोनवणे यांनी तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने होणारे दुष्परिणाम, तोंडाच्या कर्करोगाचे प्राथमिक लक्षणे आणि कर्करोगाचे देशविदेशातील रूग्णाची टक्केवारी याबाबत मार्गदर्शन केले तर अध्यक्षीय मनोगतातून डॉ. जी.एच. सोनवणे यांनी कर्करोग रोखण्यासाठी आजच्या तरूणाची जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या शेवटी तंबाखूमुक्त जाणीव जागृतीपर सामुहिक शपथ घेण्यात आली. सुत्रसंचालन डॉ. शशिकांत पाटील यांनी तर आभार शुभम चौधरी या स्वयंसेवकाने केले. कार्यक्रमास सर्व प्राध्यापक आणा स्वंयसेवक विदयार्थी उपस्थित होते.
No comments