यावल नगर परिषदच्या इतिहासात प्रथमच सफाई कर्मचारी बांधवांसोबत दिवाळी साजरी शिवसेना (शिंदे गट) तर्फे आगळावेगळा उपक्रम भरत कोळी यावल ता. प्र...
यावल नगर परिषदच्या इतिहासात प्रथमच सफाई कर्मचारी बांधवांसोबत दिवाळी साजरी
शिवसेना (शिंदे गट) तर्फे आगळावेगळा उपक्रम
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल नगर परिषदच्या इतिहासात प्रथमच सफाई कर्मचारी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्याचा आगळावेगळा उपक्रम शिवसेना (शिंदे गट) तर्फे राबविण्यात आला.
या उपक्रमाचे आयोजन शिवसेना शिंदे गटाचे पूर्व विभाग जिल्हा सहसंघटक नितिन सोनार व त्यांच्या सहकाऱ्यांनी नगर परिषद आवारात केले. कार्यक्रमात सफाई कर्मचारी बांधवांचे पाय धुऊन, त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा, मिठाई आणि फराळ देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळी नितिन सोनार यांनी सांगितले की, “कोरोना सारख्या जिवघेण्या महामारीच्या काळात सफाई कर्मचारी बांधवांनी आपल्या जीवाची पर्वा न करता शहरात स्वच्छता राखत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली. त्यांच्या त्यागाचे स्मरण ठेवून हा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.” सफाई कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत शिवसेनेचे जिल्हा सहसंघटक नितिन सोनार यांचे विशेष कौतुक केले आणि त्यांचे आभार मानले. या प्रसंगी आरीफ खान भिकन रावते, रामभाऊ सोनवणे, नगर परिषद कर्मचारी मोबीन शेख, बबलु घारू आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.


No comments