साने गुरुजी विद्यालय, यावल येथे १९८५-८६ च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...
साने गुरुजी विद्यालय, यावल येथे १९८५-८६ च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, यावल येथे सन १९८५-८६ च्या इयत्ता दहावीतील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आज दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय गुरुवर्य श्री. पी. टी. चोपडे सर यांनी स्वीकारले. या प्रसंगी पवार सर, अडकमोल सर, कलावती बेंडाळे मॅडम, एम. के. पाटील सर, तसेच मुख्याध्यापक विजय नन्नवरे सर उपस्थित होते. मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुवर्यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली, तसेच जुन्या आठवणींना उजाळा देत मौजमजेत आणि आनंदात कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गोटू फेगडे सर यांनी केले. सर्व उपस्थित माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पुढील काळातही असे उपक्रम आयोजित करून जुने सहपाठी एकत्र आणण्याचा निर्धार व्यक्त केला. १)लिलाधर खाचणे जळगांव 2) विजय घोडके यावल 3) सुनिल फेगडे यावल ४) ताराचंद धनगर ५) किरण बोरोले ६) संजय चौधरी फैजपुर ७) नलिनी करांडे मॅडम ८) अनिल जाधव यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते


No comments