adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धुपेश्वर येथे झालेल्या खून व हल्ल्याबाबत फरार आरोपींना त्वरीत अटक न झाल्यास कोळी जमात काढणार महामोर्चा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे कोळी जमात बांधवांची निवेदनाद्वारे मागणी

 धुपेश्वर येथे झालेल्या खून व हल्ल्याबाबत फरार आरोपींना त्वरीत अटक न झाल्यास कोळी जमात काढणार महामोर्चा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे कोळी जम...

 धुपेश्वर येथे झालेल्या खून व हल्ल्याबाबत फरार आरोपींना त्वरीत अटक न झाल्यास कोळी जमात काढणार महामोर्चा

उपविभागीय अधिकारी यांच्याकडे कोळी जमात बांधवांची निवेदनाद्वारे मागणी


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर : मलकापूर तालुक्यातील मौजे धुपेश्वर येथे ८ ऑक्टोंबर रोजी  झालेला खून व हल्ल्याबाबत समाज बांधवांच्या भावना तीव्र झाल्या असून या प्रकरणातील फरार आरोपींना तत्काळ अटक करीत सर्वांवर मकोका कायद्याअंतर्गत कार्यवाही करण्यात यावी तसेच या  अमानवीय घटनेचा खटला जलद गती न्यायालयात चालवून पिडीत परिवारास न्याय देण्यात यावा, किंबहुना सदर घटनेची १५ दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास बुलढाणा तसेच जळगाव जिल्ह्याच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात येईल असा गंभीर इशारा सुद्धा उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर यांना आज १२ ऑक्टोंबर रोजी कोळी समाज बांधवांच्या वतीने एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

                निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, धुपेश्वर येथे ८ ऑक्टोंबर रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्राळा येथील रहिवाशी सतीश गजानन झाल्टे व अविनाश जितेंद्र झाल्टे या युवकांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सतीश झाल्टे या युवकाचा मृत्यू झाला तर अविनाश झाल्टे हा रुग्णालयात मृत्यूची झुंज देत आहे. या घटनेतील आरोपी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यातील देवा ठाकूर हा आरोपी तडीपार असल्यावर सुद्धा तो या गुन्ह्यात सामील आहे. तरी या प्रकरणातील फरार आरोपींना तत्काळ अटक करून सर्वांवर मकोका कायद्याअंतर्गत कार्यवाही करण्यात यावी. घटना घडल्यानंतर त्यांच्याशी संबंधित व्यक्तींची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी. मृत व जखमी पिडीतांना त्यांना कुटुंबाचा आधार गेल्यामुळे ५० लाख रुपयापर्यंत मदत देण्यात यावी.  घटना घडल्यानंतर आरोपींनी केलेल्या फोनची चौकशी करून त्यांना सह आरोपी करण्यात यावे. अशा प्रमुख मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या असून याप्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अन्यथा आपल्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनावर असेल असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या निवेदनावर पीडित परिवार तसेच जळगाव व बुलढाणा जिल्ह्यातील कोळी समाज बांधवांच्या मोठ्या संख्येने स्वाक्षऱ्या आहेत.

No comments