adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कलाकेंद्रात दहशत माजवणारे गुंड जेरबंद..!स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई.. गावठी कट्टा,तीन जिवंत काडतुसे व स्कॉडा कार हस्तगत

  कलाकेंद्रात दहशत माजवणारे गुंड जेरबंद..!स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई.. गावठी कट्टा,तीन जिवंत काडतुसे व स्कॉडा कार हस्तगत  सचिन मो...

 कलाकेंद्रात दहशत माजवणारे गुंड जेरबंद..!स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई.. गावठी कट्टा,तीन जिवंत काडतुसे व स्कॉडा कार हस्तगत 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि१२.):-जामखेड येथील रेणुका कलाकेंद्राची तोडफोड करून दहशत माजवणाऱ्या टोळीला अखेर पोलिसांनी गजाआड केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या धाडसी कारवाईत 1 गावठी कट्टा, 3 जिवंत काडतुसे आणि पांढऱ्या रंगाची स्कॉडा कार असा एकूण ₹6 लाख 53 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन विशेष पथकांनी केली.


🔍 घटनेचा तपशील


जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 548/2025 भारतीय दंड विधान व आर्म्स अॅक्टअंतर्गत दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून तपासाची सूत्रे स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आली.पथकांनी तपास करून मुख्य आरोपी अक्षय किशोर बोरुडे (रा. तिसगाव, ता. पाथर्डी) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपल्या साथीदारांसह रेणुका कलाकेंद्रात घुसून तोडफोड व मारहाण केली असल्याची कबुली दिली.या टोळीत एकूण 18 आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी सात आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, उर्वरित आरोपी फरार आहेत.


🚔 जप्त मुद्देमाल


✅ 1 गावठी कट्टा

✅ 3 जिवंत काडतुसे

✅ स्कॉडा कंपनीची पांढरी कार

एकूण किंमत – ₹6,53,000/-



👮 पोलिसांची भूमिका


या कारवाईत पोलीस अधिकारी व अंमलदार —

पोहेकॉ सुरेश माळी, दिपक घाटकर, हृदय घोडके, लक्ष्मण खोकले, फुरकान शेख, श्यामसुंदर जाधव, प्रकाश मांडगे, सागर ससाणे, रोहित यमुल, भागवान थोरात, सतिष भवर, विशाल तनपुरे, प्रशांत राठोड, मपोकॉ सोनल भागवत व चा. पोहेकॉ अर्जुन बडे — यांच्या पथकांनी मोलाची भूमिका बजावली.पुढील तपास जामखेड पोलीस ठाणे करीत असून, फरार आरोपींचा शोध तीव्र करण्यात आला आहे.

No comments