खानापुर येथील मंडळ अधिकारी श्री. यासिन ईतबार तडवी यांचे विरुद्ध शिस्तभंगाची तक्रार दाखल ? भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत ...
खानापुर येथील मंडळ अधिकारी श्री. यासिन ईतबार तडवी यांचे विरुद्ध शिस्तभंगाची तक्रार दाखल ?
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
7/12 च्या अभिलेखात नोंद करणेसाठी दि.16-7-25 रोजी ग्राम महसूल अधिकारी मौजे दोधे ता. रावेर जि. जळगांव दाखल केलें.प्रकरण सादर केल्यावर दि.16-7-25 रोजी ग्राम महसूल अधिकारी मौजे दोधे श्री. रवी भागवत शिगणे यांनी फेरफार क्र.961 ची नोटीस त्यांचदिवशी ई-चावडी वर प्रदर्शित केली होती. सदर नोटीसीत हरकत नोंदविण्यासाठी 15 दिवसाचा कालावधी देण्यात आलेला होता.म्हणजे दि.30/7/25 पर्यंत हरकत
नोंदविण्याचा कालावधी देण्यात आलेला होता.गावं नमुना 6- फेरफार नोंदवही (फेरफार पत्रक) नुसार दि. 29/7/25 रोजी सदरील फेरफार 15 पंधरा दिवसांचा नोटीस कालावधी पूर्ण होण्याआधीच मंडळ अधिकारी मौजे खानापुर ता.रावेर जि. जळगांव श्री. यासिन ईतबार तडवी यांनी यांनी स्वतः चे अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन नामंजूर केला आहे. तरी असे करत असतांना त्यांनी सदर फेरफार नोंद संदर्भातील उच्च न्यायालय व वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशांचा अवमानही केलेला आहे. म.ज.म.अ.१९६६ च्या विविध कलमे व कर्तव्ये यांचा भंग करीत त्यांनी शिष्टभंग कायद्यातील नियम, शासकीय कर्मचारी वर्तणूक नियम १९७९ व शासकीय कर्तव्ये पार पडतांना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध नियम २०१३ च्या नियमांचे उल्लंघन केल्याची तक्रार मौजे दोधे येथील अन्यायग्रस्त शेतकरी बांधवाने उप-विभागीय अधिकारी (महसुल) फैजपूर भाग फैजपूर यांचे कार्यालयात दाखल केलेली आहे.

No comments