महाविकास आघाडी च्या माध्यमातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) न पा निवडणूका लढविणार प्रभागतील लोकाभिमुख समस्या सोडविण्याचे कार्य करून जनते...
महाविकास आघाडी च्या माध्यमातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) न पा निवडणूका लढविणार
प्रभागतील लोकाभिमुख समस्या सोडविण्याचे कार्य करून जनतेत पोहचा:- गुलाबराव वाघ
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल येथील शेतकी संघाच्या सभागृहात येणाऱ्या नगरपालिका,पंचायत समिती,जिल्हा परिषद निवडणूक संदर्भात आज शिवसेना ऊपनेते श्री गुलाबराव वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली . यावेळी तालुका प्रमुख पदी शरद कोळी यांची तालुका प्रमुख पदी तर संदीप माळी यांची फैजपूर शहर प्रमुख पदी नियुक्ती झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला.यावल शहरातील व तालुक्यातील अनेक पदाधिकारी व इच्छुक उमेदवार उपस्थित होते.यावेळी यावल नगरपालिका व तालुक्यातील सर्वच निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढविणार असल्याचे उपस्थितांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत यावल नगरपालिका हि शिवसेनेने लोकनियुक्त नगराध्यक्ष पद जिंकले होते म्हणून आताही हि जागा शिवसेनेने महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढून जिंकू असा आत्मविश्वास व नगराध्यक्ष पदावर दावा शहर प्रमुख जगदीश कवडीवाले यांनी व्यक्त केला.
तर मार्गदर्शन करतांना शिवसेना उपनेते लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी सांगितले की वरिष्ठांकडून आदेश येतील त्या प्रमाणे यावल तालुक्यातील सर्वच निवडणुकी संदर्भात निर्णय होईल.तोपर्यंत सर्वच कायकर्त्यांनी आपल्या प्रभागातील नागरी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा.शहरात व तालुक्यात प्रमुख व्यक्तींच्या,जुन्या जाणत्या शिवसैनिकांच्या भेटी घाटी घेऊन जनतेत सुसंवाद निर्माण करावा आणि जनताभिमुख व्हावे.आपला विजय निश्चित होईल.शिवसैनिकांचे व जनतेचे जाळे निर्माण करावे.कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले.
या वेळी बैठकीला शहरातील व तालुक्यातील अनेक पदाधिकारी शिवसैनिक व इच्छुक कार्यकर्ते उमेदवारांनी बैठकीला गर्दी केली होती.बैठकीचे सूत्र संचलन व आभार शहर प्रमुख जगदीश कवडीवाले यांनी केले.

No comments