स्व.भारतीताई तिव्हाने यांच्या स्मृती प्रित्यर्थ वाडी अदमपूर येथे समाधान शिबिर संपन्न अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अ...
स्व.भारतीताई तिव्हाने यांच्या स्मृती प्रित्यर्थ वाडी अदमपूर येथे समाधान शिबिर संपन्न
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अरविंद तिव्हाने यांचे नेतृत्व तेल्हारा/ तालुक्यातील वाडी अदमपूर येथे माजी पंचायत समिती सदस्य अरविंद तिवाणे यांच्या संकल्पनेतून स्व.भारतीताई तिवाणे यांच्या स्मृती प्रित्यर्थ सुसज्ज नियोजनात भव्यदिव्य समाधान शिबिरीचा कार्यक्रम पार पडला. या शिबिरात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी अर्जांपासून ते लाडकी बहिण योजना, आधार कार्ड, निराधार योजना आणि वृद्ध पेन्शनसारख्या विविध सरकारी योजनांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. शिबिरामुळे पंचक्रोशीतील व स्थानिक गोरगरीब नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. स्व. भारतीताई तिव्हाने यांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या या उपक्रमाचे नियोजन अरविंद तिव्हाने यांनी स्वतः केले होते.
राशन कार्ड दुरुस्ती, नवीन राशन कार्ड काढणे ,नवीन मतदान कार्ड काढणे , शेतकरी अतिवृष्टी समस्या , विमा समस्या ,रोजगार हमी योजना ,घरकुल योजनेबाबत समस्या ,शेतकरी कर्जमाफी अर्ज , बाल संगोपन योजना, सेतू अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा, बांधकाम कामगार योजना ,पी एम किसान योजना .भूमी अभिलेख नगर भूमापन .आरोग्य विभाग शिबिर, याशिवाय, विविध सरकारी योजनांशी निगडित इतर समस्या सोडवण्यासाठी तज्ज्ञ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.शिबिराचे प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी नेते प्रशांत डिक्कर उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली. "ग्रामीण भागात सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अडथळे येतात, असे शिबिर स्थानिकांना सक्षम बनवतात," असे डिक्कर यांनी सांगितले. शिबिरामुळे अनेक लाभार्थींना तात्काळ मदत मिळाली असून, विशेषत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना याचा फायदा होणार आहे. उपस्थित नागरिकांनी अरविंद तिव्हाने यांचे आभार मानले. अशा शिबिरांमुळे आमच्या समस्या सोडवल्या जातात. तिव्हाने यांच्यासारखे नेते समाजसेवेचे उत्तम उदाहरण आहेत," असे लाभार्थी उघडपणे बोलत होते. तिव्हाने यांनी आपल्या आईच्या स्मृतींना समर्पित असलेल्या या उपक्रमातून स्थानिक विकासाला चालना देण्याचा संकल्प व्यक्त केला. या शिबिराने वाडी आदमपूर परिसरातील सामाजिक जागृती वाढवली असून, भविष्यात असे आणखी उपक्रम राबवण्याची अपेक्षा आहे.यावेळी.....


No comments