साकळी प्राथमिक आरोग्य केंद्र विविध समस्यांच्या विळख्यात? भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : तालुक्यातील साकळी ...
साकळी प्राथमिक आरोग्य केंद्र विविध समस्यांच्या विळख्यात?
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : तालुक्यातील साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र विविध समस्यांचा विळख्यात अडकले असून या आरोग्य केंद्राला वाली कोण असा प्रश्न येथील ग्रामस्थां मध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
साकळी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत २२ गावे जोडण्यात आली असून आरोग्य केंद्र आजारी असल्यामुळे विविध समस्यांचा अभाव मुळे येथील कर्मचारी व रुग्णांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत आहे. दवाखान्याच्या व परीसरातील कर्मचाऱ्यांच्या रहिवाशी खोल्याच्या आजूबाजूला गाजरी गवत मोठ्या प्रमाणात झाले असून डुकराच्या उपद्रव वाढला आहे. दवाखान्यात विजेचे आठ विद्युत पोल असून पोलवर बल्ब लावण्यात आले नसल्यामुळे इमारतीच्या मागच्या बाजूला विद्युत पोलवरील लाईट बंद असल्यामुळे अंधाराचे सामराज्य आहे.
येथे दोन डॉक्टरांची नियुक्त केलेली असून एकच डॉक्टर दुपार पर्यंत हजर असतात तर दुसरे डॉक्टर दुसऱ्या आठवडयात येतात. दोन्ही डॉक्टरांनी सात - सात दिवस वाटुन घेतले आहे कि काय ? दवाखान्यात रुग्णांना पिण्यासाठी पाणी नाही बाहेरून पिण्याचे पाणीचे जार मागविण्यात येतात ते पाणी फक्त कर्मचारी पुरते मर्यादित असते. अनेक आरोग्य सेवक, सेविकांचे पद रिक्त आहे. दवाखान्यातील मुख्य प्रवेशव्दार जवळ मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दवाखान्यातील वाँल कंपाऊंडला ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात भगदाळ पडले असल्यामुळे कुत्रे, डुकरे, गावातील मोकाट गुरे वावरत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येथील आरोग्य केंद्रातील कर्मचारी विविध समस्यांनी त्रस्त असून समस्या सोडविण्यात याव्या अशी मागणी होत आहे.

No comments