adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शिक्षणाची जिद्द व धम्माची कास धरा जिल्हा प्रबंधक अनिल बनसोडे.

 शिक्षणाची जिद्द व धम्माची कास धरा जिल्हा प्रबंधक अनिल बनसोडे.  लातूर,जि. प्र. (उत्तम माने) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) पूर्वाश्रमीच्या  मह...

 शिक्षणाची जिद्द व धम्माची कास धरा जिल्हा प्रबंधक अनिल बनसोडे. 


लातूर,जि. प्र. (उत्तम माने)

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पूर्वाश्रमीच्या  महार समाजाचा व  आजच्या बौद्धांचा जो विकास झाला तो केवळ बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमुळे व वाईट चालीरीतीला ठोकर मारल्यामुळे झाला या धम्मक्रांतीने समाजाला जगण्याचे एक नवे आत्मभान मिळाले. शिक्षणासाठी गरिबी अडचण ठरत नाही फक्त शिक्षणासाठी जिद्द असावी लागते म्हणून आजच्या तरुण पिढीने शिक्षणाची जिद्द मनामध्ये बाळगून धम्माची व शिक्षणाची कास धरावी व व्यसनापासून दूर राहावे असे प्रतिपादन दूरसंचार विभागाचे जिल्हा प्रबंधक इंजिनिअर अनिल बनसोडे यांनी केले. 


ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त वैशाली सार्वजनिक बुद्ध विहार बौद्ध नगर लातूर येथे तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या  प्रतिमांना पुष्प व पुष्प माला अर्पण करून 

करण्यात आले.

याप्रसंगी  व्हीएस पॅंथरचे अध्यक्ष विनोद खटके माजी नगरसेवक सचिन मस्के हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . यावेळी जिल्हा प्रबंधक अनिल बनसोडे यांच्या हस्ते पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. 

यावेळी बुद्ध वंदना व  धम्म ध्वज गाथा व 22 प्रतिज्ञा यावेळी घेण्यात आल्या. 

यावेळी वैशाली  बुद्ध विहार येथे नव्याने साकारत असलेल्या ग्रंथालयास शंभर ग्रंथ देण्याचे अनिल बनसोडे यांनी जाहीर केले. यावेळी प्रमुख पाहुणे विनोद खटके सचिन मस्के यांनी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले यावेळी पाहुण्यांचे स्वागत सूर्यभान लातूरकर,दामू कोरडे, अशोक सातपुते ,जगन्नाथ सुरवसे, महादू गायकवाड ,सवाई दादा,शुभम भुताळे, कुणाल कांबळे, लताबाई चिकटे, अनुराधा कांबळे ,छाया कांबळे, मीना सुरवसे,आदींनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव कांबळे यांनी केले धम्मपालन गाथेने व आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments