adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा महाविद्यालयात राष्ट्रपुरुषांना अभिवादन

चोपडा महाविद्यालयात राष्ट्रपुरुषांना अभिवादन चोपडा प्रतिनिधी (संपादक-:- हेमकांत गायकवाड) महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी...

चोपडा महाविद्यालयात राष्ट्रपुरुषांना अभिवादन


चोपडा प्रतिनिधी

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालय चोपडा या ठिकाणी महात्मा गांधी अभ्यास व संशोधन केंद्र तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून चोपडा महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.त्यात वकृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, निबंध स्पर्धा, महात्मा गांधी विचार परीक्षा, एकदिवसीय गांधी तीर्थ जळगाव येथे शैक्षणिक दौऱ्याचे आयोजन आदींचा समावेश आहे.

   अभिवादन कार्यक्रम प्रसंगी सुरवातील मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. के एन सोनवणे, प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे समन्वयक डॉ एस. ए. वाघ, रजिस्ट्रार श्री. डी. एम. पाटील, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य श्री. एस. पी.पाडवी, डॉ. के. डी. गायकवाड, श्री एस. बी. देवरे, श्री. संदीप पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महात्मा गांधी अभ्यास व संशोधन केंद्र प्रमुख सौ सुनीता पाटील यांनी केले. 

    या कार्यक्रमाच्या निमित्ताने वकृत्व स्पर्धा घेण्यात आली. त्यात पूजा फुगारे प्रथम, गंगा करणकाळे द्वितीय तर कविता माळी या विद्यार्थिनी तृतीय क्रमांक पटकावला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन व प्रमाणपत्र देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ एस. ए. वाघ यांनी सध्या जगात सुरू असलेल्या तणावपूर्ण वातावरणात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांची गरज अधोरेखित केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के एन सोनवणे यांनी मराठी साहित्यातील अनेक साहित्यिकांचे उदाहरण देत महापुरुषांच्या योगदानाचे महत्त्व सांगितले व त्याचप्रमाणे आजच्या तरुणांनी महापुरुषांचे विचार अंगीकृत करून आपली प्रगती साधावी असे विचार मांडले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा वाणी या विद्यार्थिनींनी केले तर आभार डॉ. के. डी. गायकवाड यांनी मानले. या कार्यक्रमास बहुसंख्या संख्येने विद्यार्थी हजार होते.

No comments