आद्यपुरुष वाल्मिकी बहुउद्देशीय संस्थेतर्फे महर्षी वाल्मिकी जयंती साजरी. चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा:-रामायण रचीते मह...
आद्यपुरुष वाल्मिकी बहुउद्देशीय संस्थेतर्फे महर्षी वाल्मिकी जयंती साजरी.
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा:-रामायण रचीते महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंतीनिमित्त चोपड्यात आद्यपुरुष वाल्मिकी बहुउद्देशीय संस्थेतर्फे मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तीस माल्यार्पण करून त्यांच्या कार्यास उजाळा देण्यात आला.आद्यपुरुष महर्षी वाल्मिकी बहूउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मगन बाविस्कर ,उपाध्यक्ष भरत बाविस्कर,सचिव भाईदास कोळी,यांच्या वतीने हॉटेल गारवा याठिकाणी ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेचे अध्यक्ष मगन बाविस्कर यांनी सांगितले की आम्ही सर्व धर्मियांसाठी विविध समाजाभिमुख कार्य,सामाजिक धार्मिक उपक्रम व सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन लवकरच करण्याचा आमचा मानस आहे अस मत व्यक्त केले.
यावेळी भाजपचे जेष्ठ नेते आत्माराम म्हाळके,एमआयडीसीचे चेअरमन महेंद्र(पप्पू)सोनार,माजी नगरसेवक कैलास सोनवणे,मालुताई विजय बाविस्कर,भाजपचे नेते चंद्रशेखर पाटील,भाजपचे तालुकाध्यक्ष कांतीलाल पाटील,शहर अध्यक्ष नरेंद्र पाटील,धनंजय पाटील,रावसाहेब पाटील, दीपक बाविस्कर, माजी सभापती नारायण पाटील,प्रदीप पाटील,भरत पाटील,एकनाथ पाटील,भाजपचे महामंत्री राकेश पाटील,रविंद्र मराठे,ऍड एस डी सोनवणे,तुषार पाठक, पत्रकार व राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजीक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष मिलिंद सोनवणे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी हजर होते.

No comments