सरदार वल्लभभाई इंग्लिश व सेमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी भरत कोळी यावल ता.प्रतिनि...
सरदार वल्लभभाई इंग्लिश व सेमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई इंग्लिश मीडियम व सेमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
शाळेचे अध्यक्ष डॉ. श्री. प्रदीप माहेश्वरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शिला तायडे मॅडम यांच्या हस्ते सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यानंतर सौ. तायडे मॅडम यांनी स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री असलेल्या सरदार पटेल यांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानाविषयी माहिती दिली. त्यांनी स्वातंत्र्यानंतर भारताला एकसंध करण्याची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडल्याचे सांगितले. तसेच शिक्षकांनी सरदार पटेल यांच्या आदर्शातून प्रेरणा घ्यावी, असे मार्गदर्शनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना चौधरी मॅडम यांनी केले. या प्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments