चुंचाळ्यात रविवारी सुकनाथ बाबा मुर्ती स्थापनेचा वर्धापनदिन सोहळा चातुर्मास समाप्ती निमीत्त कार्यक्रम भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक...
चुंचाळ्यात रविवारी सुकनाथ बाबा मुर्ती स्थापनेचा वर्धापनदिन सोहळा
चातुर्मास समाप्ती निमीत्त कार्यक्रम
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल :- तालुक्यातील चुंचाळे येथील श्री वासुदेव बाबा दरबारात श्री समर्थ सुकनाथ बाबांच्या मुर्ती स्थापनेचा वर्धापन दिन सोहळा रविवारी दिनांक 2 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे सन 2000 साली श्री समर्थ वासुदेव बाबांनी त्यांचे आजांगुरु श्री समर्थ सुकनाथ बाबा यांच्या 21 किलो चांदीच्या मुर्तीची प्राणप्रतीष्ठा केली होती ती पंरपरा शिष्य व गावकरी मडळीनी सतत सुरु ठेवलेली आहे
असा होईल कार्यक्रम...
सकाळी सहाला मारोती अभीषेक साडेसहाला सुकनाथ बाबा व रघुनाथ बाबा,वासुदेव बाबा,समाधीवाले बाबा,यांच्या मुर्तीला स्नान व मुर्ती अभीषेक साडेसातला आरती साडेआठ पासून भजन भारुडाना सुरुवात होईल दुपारी बाराला महाआरती होऊन एक वाजेपासून महाप्रसादास सुरुवात होईल महाप्रसाद रात्री शिष्य गणाच्या आगमणापर्यन्त सुरु राहील
अशी आहे अख्यायका...
श्री सुकनाथ बाबांनी येथे अंखड 12 वर्ष तप केल्याने या गावास महत्व प्राप्त झाले आहे सुकनाथ बाबा काशी येथून भ्रमण करीत चुंचाळे येथे आले होते बाबांना पशु पक्षांची बोली अवगत होती वर्षाकाठी पशुपक्षांना सहा ते सात क्विंटल धान्य दररोज खाऊ घालत होते बारा वर्ष ज्या जागेवर बाबांनी तप केले त्या ठिकाणी असलेली मातीची टेकडी गावकरी मंडळीना उकरायला सागीतले असता त्यामंध्ये पुरातन समाधी निघाली त्या दिवसापासून पुजा आरती सुरु करुन बाबांनी समाधीवाले बाबा अशी ओळख झाली श्री सुखनाथ बाबांनी 110 वर्षापुर्वी येथे बालकांना शिक्षणासाठी शाळा सुरु केली व बालकाना शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचे कार्य केले श्री सुकनाथ बाबाना चुंचाळे येथेच पुत्ररत्नाची प्राप्ती झाली ते म्हणजे श्री रघुनाथ बाबा होत रघुनाथ बाबांनी नाथ साम्प्रदायाच्या प्रचारासाठी आपल्या हाती झेंडा घेत कार्य सुरु केले त्यांच्यासोबत श्री वासुदेव बाबा हे स्वतः चे घर सोडून आध्यात्मिक कार्य करु लागले श्री सुकनाथ बाबा व रघुनाथ बाबांनी वर्डी (ता.चोपडा)येथे समाधी घेतली आहे गुरुच्या आदेशाने श्री वासुदेव बाबांनी आध्यात्मिक व शैक्षणिक कार्य सुरु केले गावात मदिराचे तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे व सुकनाथ बाबा वनवासी वस्तीगृहाचे बाधकाम केले
21 किलो पंचधातुची मुर्ती...
कर्नाटकमधील उमदी गावातुन 98 वर्षाच्या मुर्तीकाराने तयार केलेली 21 किलो पंचधातुची मुर्ती तयार करण्यात आली याच मुर्तीचे दोन वर्षानंतर म्हणजे 2000 साली भक्ताच्या व गावकर्याच्या आग्रहाखातर प्राणप्रतीष्ठा करण्यात आली श्री सुखनाथ बाबांच्या मुर्ती स्थापनेच्या वेळी गावातील सर्व धर्माच्या धार्मीक स्थळांना रंगरंगोटी केली होती मुर्तीची मीरवणूक तडवी वाड्यातुन मस्जीद पर्यन्त गेल्याने सर्वधर्म समभावाचा संदेश देण्यात आला होता यावेळी चातुर्मासाचा कार्यक्रम देखील होत असतो दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहान श्री समर्थ वासुदेव बाबा भक्तगणांनी व ग्रामस्थांनी केले आहे

No comments