धनाजी नाना महाविद्यालयात ज्युडो आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचे यशस्वी आयोजन इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर येथील ...
धनाजी नाना महाविद्यालयात ज्युडो आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचे यशस्वी आयोजन
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत जळगाव विभागातील ज्युडो आंतर महाविद्यालयीन स्पर्धा २०२५ चे यशस्वी आयोजन करण्यात आले. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास अध्यक्ष म्हणून तापी परिसर विद्यामंडळ संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्रा. डाॅ. एस. के. चौधरीसर, तर उदघाटक म्हणून संस्थेचे चेअरमन मा. श्री. लिलाधर विश्वनाथ चौधरी साहेब आणि प्रमुख पाहूने म्हणून संस्थेचे व्हाईस चेअरमन मा. श्री. के. आर. चौधरीसर, मा. श्री. मा. प्राचार्य डाॅ. एस. एस. पाटीलसर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे सर, पाल महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. लभाने सर हे उपस्थितीत होते. सदरील स्पर्धे साठी सर्व संचालक मंडळातील सदस्यांनी शुभेच्छा दिल्या. प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. हरीश नेमाडेसर, जीमखाना समिती चेअरमन प्रा. डाॅ. ए. के. पाटील सर, जळगाव विभागाचे सचिव प्रा. सुभाष वानखेडे प्रा. डॉ. गोविंद सदाशिवराव मारतळे, प्रा. डाॅ. मुकेश पवार, प्रा. डॉ. महेश पाटील, प्रा. डाॅ. उमेश पाटील, प्रा. माधुरी नारखेडे मॅडम आदि उपस्थित होते.
सदरील स्पर्धेत जळगाव विभागातील सहा पुरुष व एका महिला संघानी सहभाग नोंदविला.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे चेअरमन मा. श्री. लिलाधर विश्वनाथ चौधरी साहेब यांनी ज्युडो हा क्रीडा प्रकार कुस्ती सारखाच भारतात प्राचीन काळापासून खेळला जातो व त्यातुन मनुष्याचे अमूल्य असे शरीर निरोगी ठेवण्यास मदत होते असे सांगितले. मौल्यवान शरीराला प्राप्त करण्यासाठी खेळ एक उत्तम साधन व माध्यम आहे. खेळाच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक व सामाजिक विकास साधता येतो त्या करीता सर्वानी खेळात सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. डाॅ. एस. के. चौधरीसर यांनी सर्व खेळाडूना शुभेच्छा देऊन हार विजयाची परवा न करता खेळाचा आनंद घेत सातत्याने सराव करा असे सुचविले. या सोबतच सर्वांनीच खेळाकडे एक करिअर म्हणून पाहिले पाहिजे व त्या उद्देशानेच खेळाचा नियमीत सराव करून आपले, राज्याचे व देशाचे नाव लौकिक करावे असे सांगितले आणि सर्व खेळाडूंनी सहभाग घेतल्या बदल अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. गोविंद मारतळे यांनी ज्युडो हा क्रीडा प्रकार प्राचीन काळापासून ते अधुनीक ऑलिंपिक मध्ये सहभागी असलेला क्रीडा प्रकार आहे. सदरील क्रीडा प्रकारात पदक प्राप्त करून नौकरी सुध्दा मिळविता येते असे सांगितले व आलेल्या सर्व खेळाडूंनी सकारात्मक विचार करून खेळाचा नियमीत सराव करावा असे सांगितले.
ज्युडो पुरूष गटात प्रथम व्हि. एस. नाईक महाविद्यालय, रावेर, व्दितीय- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव, तृतीय- आ. र. भा. गरूड महाविद्यालय, शेदूर्णी तर चौथा क्र. धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर व महिलांमध्ये प्रथम, आ. र. भा. गरूड महाविद्यालय, शेदूर्णी, व्दितीय - धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर, तृतीय- श्री व्हि. एस. नाईक महाविद्यालय, रावेर आणि चौथा क्र. पी. जी. यु. जी. जीमखाना विद्यापीठ जळगाव हे विजयी झाले. विजय झालेले खेळाडू विभागीय स्पर्धेत साक्री महाविद्यालय येथे सहभागी होतील.
स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी जळगाव जिल्हा ज्युडो असोसिएशन चे पंच यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गोविंद सदाशिवराव मारतळे यांनी केले तर आभार प्रा. शिवाजी मगर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी जिमखाना समिती चेअरमन प्रा. डॉ. ए. के. पाटील सर, प्रा. डाॅ. गोविंद मारतळे, प्रा. शिवाजी मगर आणि राजेंद्र ठाकुर आणि खेळाडू यांनी परिश्रम घेतले.

No comments