फैजपूर नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिला राखीव इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आगामी नगर पालिका निवडणुकीचा बि...
फैजपूर नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिला राखीव
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आगामी नगर पालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून आज दिनांक ६ ऑक्टोंबर २०२५ रोजी नगरपालिका नगराध्यक्षचा लोकनियुक्त नगराध्यक्ष आरक्षण मुंबई मंत्रालयात जाहीर करण्यात आले.
फैजपूर नगरपालिका नगराध्यक्ष पदी सर्व साधारण महिला (जनरल) निश्चित करण्यात आले असून फैजपूर पालिकेत पूर्वी एकूण १७ वार्ड होते मात्र शासनाच्या निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे त्यात वाढ करण्यात आले आहे. तर आता एकूण २१ वार्ड निश्चित करण्यात आलेले आहे त्यात ५० % टक्के महिला राज असणार आहे. कोणकोणते पक्ष नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार देणार हे पुढील राजकीय गणित ठरणार आहे आरक्षण जाहीर झाल्याने उमेदवारी साठी राजकीय गोटात व तर्क वितर्क लावत आहे.

No comments