स्नेह ज्ञानदीप प्रकल्पात उजळली ज्ञानाची दिवाळी..!स्नेहालय संस्था व मनपा.चा अभिनव उपक्रम;विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक कीट वाटप सचिन मोक...
स्नेह ज्ञानदीप प्रकल्पात उजळली ज्ञानाची दिवाळी..!स्नेहालय संस्था व मनपा.चा अभिनव उपक्रम;विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक कीट वाटप
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर :- स्नेहालय संस्था आणि नगर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानाने राबविण्यात येणाऱ्या स्नेह ज्ञानदीप प्रकल्पाच्या माध्यमातून अहिल्याबाई होळकर मनपा शाळा क्र. ११ येथे दिवाळी महोत्सव उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना वह्या आणि शैक्षणिक कीट वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. राजीव गुजर सर, मा. वैशाली चोपडा मॅडम, मा. हनीफ शेख सर, मा. बाबासाहेब चिकणे सर आणि मा. शिकस्ता शेख मॅडम उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना हनीफ शेख सर यांनी केली. त्यांनी स्नेह ज्ञानदीप प्रकल्पाच्या तीन महिन्यांच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेत शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या सकारात्मक बदलांची माहिती दिली. वैशाली चोपडा मॅडम यांनी मुलांना गाणी व गोष्टींमधून प्रेरणादायी संदेश दिला, तर राजीव गुजर सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या स्वप्नांविषयी जाणून घेतले.
मुख्याध्यापक बाबासाहेब चिकणे सर यांनी स्नेहालयसोबतच्या सहकार्यामुळे शाळेतील वातावरणात झालेल्या सकारात्मक बदलांवर प्रकाश टाकला. सचिन वाघ सर यांनी विद्यार्थ्यांची उपस्थिती, पालकांचा सहभाग आणि शैक्षणिक प्रगती यांचा सविस्तर आढावा सादर केला.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मराठी व इंग्रजी कविता, लघुगोष्टी सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. शेवटी सचिन वाघ सर यांनी आभार प्रदर्शन करून सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. या उपक्रमाच्या यशासाठी एडमिन टीम, बाबासाहेब चिकणे सर, शिकस्ता मॅडम, सोनाली इंगळे मॅडम आणि सचिन वाघ सर यांनी विशेष परिश्रम घेतले.ज्ञान आणि स्नेह यांच्या प्रकाशाने उजळलेल्या या दिवाळी महोत्सवाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या वाटचालीत नवी प्रेरणा दिली.

No comments