सोलार दिवे बसवल्यामुळे नागरिकांमध्ये कही कुशी कही गम. फाईल चित्र लातूर जि. प्र. (उत्तम माने) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) निलंगा : न...
सोलार दिवे बसवल्यामुळे नागरिकांमध्ये कही कुशी कही गम. 
फाईल चित्र
लातूर जि. प्र. (उत्तम माने)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
निलंगा : नगरपालिकेने शहरात ३० ठिकाणी सोलार ऊर्जेवरचे हायमास्ट लाईट बसवल्याने शहराच्या सुरक्षतेत वाढ झाली आहे. तसेच अपघात किंवा गुन्हेगारी घटना कमी होण्यास मदत होणार आहे. आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नातून या हायमास्ट बसवल्याचे माजी नगराध्यक्ष श्रीकांत उर्फ बाळासाहेब शिंगाडे यांनी सांगितले. निलंगा शहरातील ईनामवाडी प्रभागात २ ईनामवाडी वडारवस्ती, जिजाऊ सृष्टी येथे १, वाघ कॉलनी गणेश मंदीर परिसरात १, शांतीवन सार्वजनिक स्मशानभूमी १ नग, दादापीर दर्गा येथे २, शिवाजी नगर देवी मंदीर परिसरात १ नग, पोलीस स्टेशन परिसरात २, माळी गल्ली येथे १, माळी समाज स्मशानभूमी येथे १, बसव मठ परिसर येथे १, लिंगायत स्मशानभूमी येथे श्नग, दफनभुमी येथे १, दापका वेस येथे १, अग्निशमन केंद्र १, स्वामी समर्थ समाज मंदीर आदी २७ भागांमध्ये ३० दिवे बसवण्यात आले आहे. या पथदिव्यांमुळे देखभालीचा खर्च कमी होतो. जास्त दिवस टिकतात. शिवाय, प्रकाश भरपूर पडतो आणि वीजबिल कमी येते, असे मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांनी सांगितले, तसेच निलंगा शहाराशी असलेल्या बँक कॉलनी व आनंदनगर, MIDC या भागामध्ये सोलार दिवे का बसवण्यात आले नाहीत आमच्यावर अन्याय का अशी खमंग चर्चा नागरिकामध्ये चालू आहे.
No comments