adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) च्या रावेर लोकसभा क्षेत्राच्या जिल्हा उपाध्यक्षपदी समाधान पाटील

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) च्या रावेर लोकसभा क्षेत्राच्या जिल्हा उपाध्यक्षपदी समाधान पाटील  भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपाद...

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) च्या रावेर लोकसभा क्षेत्राच्या जिल्हा उपाध्यक्षपदी समाधान पाटील 


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मनवेल ता. यावल : येथून जवळच असलेल्या नावरे येथील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच समाधान पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) च्या रावेर लोकसभा क्षेत्राच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

समाधान पाटील यांच्या सक्रिय सामाजिक कार्याचा व पक्ष संघटनेतील अनुभवाचा विचार करून ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

समाधान धनसिंग पाटील यांना निवडीचे पत्र जळगाव जिल्हाध्यक्ष उमेश कालीदास नेमाडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या निवडीमुळे पक्षाची रावेर लोकसभा क्षेत्रातील संघटना अधिक मजबूत होण्यास मदत मिळेल, असा विश्वास जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केला.

निवडपत्रात व्यक्त केलेली अपेक्षाः

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे, तसेच खान्देश प्रभारी आमटार अनिल पाटील , जिल्हयांच्या प्रभारी प्रतिभाताई शिंदे, यावल येथील भगतसिंग पाटील यांना अभिप्रेत असलेली संघटना बांधण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल, अशी अपेक्षा पाटील यांना दिलेल्या निवडपत्रात व्यक्त करण्यात आली आहे. पाटील यांनी यापूर्वी नावरे गावचे सरपंच म्हणून प्रभावीपणे काम केले आहे. तसेच, सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. समाधान धनसिंग पाटील यांच्या जिल्हा उपाध्यक्षपदाच्या निवडीचे वृत्त कळताच यावल तालुक्यासह संपूर्ण रावेर लोकसभा क्षेत्रातून सर्व स्तरावरून त्यांचे हार्दिक अभिनंदन व स्वागत करण्यात येत आहे.

No comments