adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावलला मृताच्या वारसास दोन लाखांचा विमा धनादेश वाटप

यावलला मृताच्या वारसास दोन लाखांचा विमा धनादेश वाटप   भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक...

यावलला मृताच्या वारसास दोन लाखांचा विमा धनादेश वाटप  


भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेतून मृत विमाधारक हिरालाल लालचंद पंडित (राहणार बाबुजीपुरा, यावल) यांच्या वारस किरण हिरालाल पंडित यांना दोन लाख रुपयांचा विमा धनादेश प्रदान करण्यात आला.

सदर विमा योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा (एलआयसी) अंतर्गत असून, केवळ ₹436 वार्षिक कपातीवर हा विमा मिळतो. पंडित यांचे निधन झाल्यानंतर बँक शाखेने त्वरित कार्यवाही करत वारसांना विमा रक्कम दिली. धनादेश वितरण प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे, तसेच ब्रँच मॅनेजर सचिन सूर्यभान काकडे (ज्यांचा आज वाढदिवस होता) यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला. यावेळी भूषण फेगडे, चेतन अढळकर, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या असिस्टंट मॅनेजर वैशाली नगराळे, जानवी खोडे, चेतनसिंह राजपूत, महेश खाचणे, भूषण महाजन आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, “अल्प रकमेचा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा प्रत्येक खातेदाराने घ्यावा. अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास वारसांना मोठा आर्थिक दिलासा मिळतो.” महाराष्ट्र ग्रामीण बँकेने आतापर्यंत 41 दावे मंजूर करून 82 लाख रुपयांची विमा रक्कम वारसांना वितरित केली आहे. तसेच ब्रँच मॅनेजर सचिन सूर्यभान काकडे, राजेश हिंगणेकर, आशिष सातपुते, मयूर पवार, विक्रम डकाते यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कॅम्पद्वारे ग्राहकांना अटल पेन्शन योजना व विमा याबाबत जागरूकता केली जात आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा क्र. 5508, फालक नगर, भुसावळ रोड, यावल — नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन शाखा व्यवस्थापकांनी केले.

No comments