कुस्तीच्या रंगमंचावर कृष्णा महाजनची दमदार कामगिरी चाळीसगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चाळीसगाव : क्रीडा युवक सेवा संचालनालय म...
कुस्तीच्या रंगमंचावर कृष्णा महाजनची दमदार कामगिरी
चाळीसगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चाळीसगाव : क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, तालुका क्रीडा संकुल समिती चाळीसगाव तसेच जिल्हा कुस्तीगीर संघ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शालेय कुस्ती स्पर्धा मोठ्या उत्साहात व थाटामाटात चाळीसगाव येथे पार पडली. जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून आपली ताकद आणि कौशल्य दाखवले. या जिल्हास्तरीय स्पर्धेत इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, धरणगावचा इयत्ता अकरावी विज्ञान शाखेचा गुणी विद्यार्थी कृष्णा गोरख महाजन याने 74 किलो वजनी गटात जबरदस्त संघर्ष करत प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले. आपल्या चिकाटी, दमदार तंत्र आणि जिद्दीच्या जोरावर त्याने विजेतेपद मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कृष्णाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल प्राचार्या सुरेखा पाटील व पर्यवेक्षक ए. एस. पाटील यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. संस्थेचे चेअरमन डी. जी. पाटील, सचिव सी. के. पाटील,संचालक भरत पाटील, मच्छिंद्र पाटील,अश्विन पाटील यांनी त्याच्या कामगिरीचे कौतुक करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या विजयानंतर महाविद्यालयात आणि धरणगाव शहरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. कृष्णाला यशस्वी होण्यासाठी जेष्ठ क्रीडा शिक्षक डी. एन. पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांची मेहनत, कठोर सराव आणि मार्गदर्शकाचे प्रोत्साहन यामुळेच हे विजेतेपद शक्य झाल्याचे सर्वांनी नमूद केले. कुस्ती क्षेत्रात जिल्हास्तरावर गाजवलेले हे यश भविष्यात राज्यस्तरीय स्पर्धेतही अधिक मोठी कामगिरी करण्याची नांदी असल्याचे क्रीडाप्रेमींचे मत आहे. कृष्णाच्या या विजयानंतर त्याच्याकडून आणखी मोठ्या अपेक्षा व्यक्त होत आहेत.

No comments