फैजपूर सह कारखाना येथे संविधान नगर मध्ये वर्ष वास प्रवचन मालिकेचा समारोप इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर सह. कारखा...
फैजपूर सह कारखाना येथे संविधान नगर मध्ये वर्ष वास प्रवचन मालिकेचा समारोप
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर सह. कारखाना येथे वर्षावास समारोप संपन्न. दि.5/10/2025 रोजी फैजपूर सह. कारखाना येथील संविधान नगर मधे वर्षावास प्रवचन मालिकेचा समारोप करण्यात आला.सर्वात प्रथम तथागत भगवान बुद्ध आणि बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष रवींद्र वानखेडे, महिला जि. अध्यक्षाप्रियंका ताई अहिरे, जि. सरचिटनीसवैशाली सरदार, जि. सरचिटणीससुशील कुमार हिवाळे, जि उपध्यक्षवसंत दादा लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात सामुदायिक वंदनेने करण्यात आली.धम्म उपासक उपासिका यांना भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच धम्म सेवक शुद्ध धन खंडारे यांनी सर्व संघटना एकत्रित येणे गरजेचे आहे असे सांगितले आणि धम्म गन्तिमान कसा करता येईल याचा विचार आपण केला पाहिजे. सुशील कुमार हिवाळे, वसंत लोखंडे, वैशाली सरदार, प्रियंका अहिरे, कामिनी तायडे मॅडम, लताबाई सदानंद मेढे, धम्म सेवक विष्णू मेश्राम आणि जिल्हा संघटक वसुंधरा मेढे यांचे मार्गदर्शन लाभले. सविधान नगर मधील महिला मंडळ प्रमुख संगीताताई तायडे, संतोष तायडे, कुसुमबाई लोखंडे, मिराबाई तायडे, ज्योती वाघ, अपर्णा तायडे, सराबाई भालेराव, सीमा जंजाळे, आराधना जाधव, रत्ना जाधव, प्रज्ञा सोनवणे यांचे सहकार्य लाभले विशेष उपस्थिती सुरेश तायडे, सिद्धार्थ निकम सर, लक्ष्मीबाई मेढे, कल्पना पोहेकर, विष्णू पोहेकर पोलीस कॉन्स्टेबल, नगरपरिषद सावदा तत्कालीन उपनगराध्यक्ष नंदाताई लोखंडे, सुजाता सपकाळे, फैजपूर शहर अध्यक्षा प्रतिभा अवसरमल, कोकिळाबाई मेढे यांनी उपस्थिती दिली.वर्षावास प्रवचन मालिकेचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक यावल तालुका अध्यक्ष बी. डी. महालेसरयांनी केले. यावल महिला तालुका अध्यक्षा मायाताई सुरेश तायडे यांना धम्म पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे पदाधिकारी यांनी शाल गुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला व मायाताई तायडे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.

No comments