डंपर घेण्यासाठी विवाहित महिलेला तगदा, विवाहित महिलेने संपविले जीवन, पती,दिर,सासरा,सासूवर गुन्हा दाखल वैष्णवी हगवणे प्रकरणाची जळगावतही पुनर...
डंपर घेण्यासाठी विवाहित महिलेला तगदा, विवाहित महिलेने संपविले जीवन, पती,दिर,सासरा,सासूवर गुन्हा दाखल वैष्णवी हगवणे प्रकरणाची जळगावतही पुनरुक्ती ?
संभाजी पुरीगोसावी (जळगांव जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरुक्ती जळगांवतही झाली आहे. जंगीपुरा (ता. जामनेर) येथील भाग्यश्री राहुल राजपूत (वय 27) हिला सासरच्यांनी माहेरवरून डंपर घेण्यासाठी 20 लाख रुपये घेवुन ये, तसेच तुझ्या बापाने लग्नातही हुंडा कमीच दिला होता असे म्हणत मंगळवारी मध्यरात्री मारहाण केली तसेच गळफास लावून मारून टाकण्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात पती दिर सासू-सासरा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. भाग्यश्री राजपूत हिच्या आकस्मित मृत्यूची नोंद ही पहूर पोलीस ठाण्यात झाली आहे. तिच्या आत्महत्यामुळे परिसरात ताण-तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भाग्यश्री हिचा विवाह जंगीपुरा येथील राहुल गोविंदसिंग राजपूत यांच्याशी 2020 मध्ये झाला होता. लग्नात हुंडा कमी दिल्याने माहेरवरून 20 लाख रुपये घेवुन ये असे सांगत पती तिला वारंवार मानसिक छळ करीत होता याच त्रासाला कंटाळलेल्या भाग्यश्रीने अखेर आपली जीवन संपविले आहे. भाग्यश्री हिंच्या पश्चात तीन वर्षाचे बाळ आहे. माहेरच्या लोकांनी काही वेळ मृतदेह ताब्यात घेतला नाही मात्र वडिलांच्या फिर्यादीवरून माझ्या मुलीच्या आत्महत्येला सासरचे मंडळी जबाबदार आहेत तिचा मानसिक आणि शारीरिक तसेच डंपर घेण्यासाठी 20 लाख घेवुन या असा तगदा त्यांनी लावला होता. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांनी तातडीने पती दीर-सासू-सासरे यांना ताब्यात घेवुन हुंडाबळी शारीरिक व मानसिक छळ मारहाण अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल केला अटक केल्याने मृतदेह माहेरच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. भाग्यश्री च्या आत्महत्या मुळे पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरुती झाल्याची देखील चर्चा आहे. भाग्यश्री राजपूत यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे तीन वर्षाचे बाळ यशचे मातृछाया हरपले असून भाग्यश्री हिने भाग्य हुंडाबळीने संशय असल्याचा संताप भावना माहेरच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्या आहेत.

No comments