"शिक्षणातून स्वयंरोजगाराची संधी"--प्राध्यापिका सौ .पी .व्ही. नारखेडे (वाणिज्य विभाग) सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकां...
"शिक्षणातून स्वयंरोजगाराची संधी"--प्राध्यापिका सौ .पी .व्ही. नारखेडे (वाणिज्य विभाग)
सतिश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
श्रीमती जीजी खडसे महाविद्यालय संचलित अर्थशास्त्र विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांना स्टार्ट अप योजनेअंतर्गत विविध लघु व्यवसायांची माहिती व त्यासाठी लागणाऱ्या पात्रता व विविध कागदपत्रांची पूर्तता कशी करावी याची माहिती देऊन व्यवसाय आज काळाची गरज आहे या संदर्भात सखोल मार्गदर्शन प्राध्यापिका सौ .पी. व्ही. नारखेडे यांनी त्यांच्या व्याख्यानातून केले विद्यार्थ्यांनी फक्त नोकरीच्या विविध क्षेत्रातील संधी शोधण्यात वेळ वाया न घालवता स्वयंरोजगारातून स्वतःची व देशाची प्रगती कशी करता येईल व आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपल्यातील कौशल्य पणाला लावून व्यवसायाकडे वळावे असे मोलाचे मार्गदर्शन केले
आपल्या अध्यक्षीय मनोगतातून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. वंदना चौधरी यांनी व अल्प व्यवसाय कौशल्य असले तरी सुरुवात करणे किती महत्त्वाचे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले व विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला विद्यार्थ्यांना सुद्धा एक वेगळी ऊर्जा त्यातून प्राप्त झाली
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.पी.पी .चौधरी ,वाणिज्य विभाग प्रा.एस .एल .खडसे यांनी सहकार्य केले सदर कार्यक्रमाचे संचालन प्रा.जी .व्ही. नाफडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अर्थशास्त्र विभागाच्या प्रा .सविता जावळे मॅडम यांनी केले.

No comments