adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा येथे बुध्द वर्षावास कार्यक्रम उत्सवात संपन्न

  चोपडा येथे बुध्द वर्षावास कार्यक्रम उत्सवात संपन्न.  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा (दि.८) - येथील संत गजानन बहु. उद्द...

 चोपडा येथे बुध्द वर्षावास कार्यक्रम उत्सवात संपन्न. 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा (दि.८) - येथील संत गजानन बहु. उद्देशीय संस्थेच्या वतीने भगवान गौतम बुद्ध यांचा वर्षावस कार्यक्रम दि.६ रोजी नगर परिषद नाट्य गृहात उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ धन्वंतरी डॉ.विकास हरताळकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन आणि भगवान गौतम बुद्धांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संविधानाचे अभ्यासक आधार पानपाटील, 

डॉ.मनोज साळुंखे,पत्रकार शाम जाधव,बाल मोहन महाविद्यालयाचे व्यवस्थापक विजय दिक्षीत,हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर यांचे स्वागत रुपेश भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले.संत गजानन बहु.उद्देशिय संस्थेच्या वतीने आयोजित वर्षावास कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मनोज चित्रकथी,विवेक बाविस्कर,योगेश चौधरी यांनी आपल्या सुरेल आवाजाने बुध्द उपासना, भगवान बुध्द यांच्यावर आधारित गीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रास्ताविकात आधार पानपाटील भगवान गौतम बुद्धांच्या जीवन चरित्राचे कथन करून वर्षावास या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. संगीत सभेत सर्वच गीतांना तबला साथसंगत संस्थेचे सचिव विजय पालीवाल, नरेंद्र भावे, हार्मोनियम अध्यक्ष मनोज चित्रकथी, बासुरी वादन भागवत जाधव, यांनी दिली. संगीत चमूत दुर्गेश चौधरी, सुयश मगरे, पीयूष पाटील, प्रेम वाघ, आदींचा सहभाग होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संत गजानन बहु.उद्देशिय संस्थेच्या कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.

No comments