शासकीय-निमशासकीय योजनांचा लाभ घेऊन स्वावलंबी व्हा...! प्रा. गाडे सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मुक्ताईनगर तालुका एज...
शासकीय-निमशासकीय योजनांचा लाभ घेऊन स्वावलंबी व्हा...! प्रा. गाडे
सतिश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालयात दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी पीएम-उषा अंतर्गत व अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मागासवर्गीय विद्यार्थी करिता उच्च शिक्षणाच्या विविध संधी व योजना या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत महाजन उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. सी.पी. गाडे भूगोल विभाग व्ही.एस. नाईक महाविद्यालय, रावेर यांची विशेष उपस्थिती होती.
प्रा. गाडे यांनी प्रथम सत्रात केंद्र व राज्य सरकारच्या विविध शासकीय योजनांची माहिती देऊन विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणात उज्वल यश संपादन करून स्वावलंबी बनावे असा संदेश दिला तसेच द्वितीय सत्रात प्रा. गाडे यांनी राज्य व देशभरातील तसेच एनजीओ यांच्याशी निगडित असलेल्या विविध निमशासकीय योजनांची माहिती आत्मसात करून आत्मनिर्भर बनून कुटुंब, समाज व राष्ट्र विकसित करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य महाजन यांनी विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया व वृत्तपत्राच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती घेऊन स्वतःची उन्नती साधावी असे सूचित केले. या संपूर्ण कार्यशाळेचे संयोजन महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. डॉ. वंदना चौधरी यांनी केले. या कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. संजीव साळवे, पीएम -उषाचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर अनिल पाटील व सह समन्वयक प्रा. डॉ. अतुल वाकोडे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यशाळा यशस्वी करण्याकरिता महाविद्यालयातील युवती सभा समन्वयक प्रा. डॉ. सुरेखा चाटे प्रा. इस्माईल शेख, प्रा. दत्तात्रय कोळी प्रा. दीपक बावस्कर, प्रा. डॉ. अतुल बढे व प्रा. एस. एन. पाटील यांनी परिश्रम घेतले.
या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. विजय डांगे यांनी तर प्रास्ताविक प्रा. अतुल वाकोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन युवती सभा समन्वयक प्रा. सुरेखा चाटे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना ई- प्रमाणपत्र देण्यात आले.

No comments