केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांचे शिर्डीत आगमन सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेम...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांचे शिर्डीत आगमन
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.५):-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज शिर्डी विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.या वेळी जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचेही शिर्डी विमानतळावर आगमन झाले.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार,केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनीही श्री.शाह यांचे स्वागत केले.यावेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे,जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया,जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments