adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अहिल्यानगर जिल्हापरिषद,पंचायत समिती निवडणुकीची प्रारुप मतदार यादी जाहीर..१४ ऑक्टोबरपर्यंत हरकती,सूचना दाखल करण्याचे आवाहन

 अहिल्यानगर जिल्हापरिषद,पंचायत समिती निवडणुकीची प्रारुप मतदार यादी जाहीर..१४ ऑक्टोबरपर्यंत हरकती,सूचना दाखल करण्याचे आवाहन  सचिन मोकळं अहिल्...

 अहिल्यानगर जिल्हापरिषद,पंचायत समिती निवडणुकीची प्रारुप मतदार यादी जाहीर..१४ ऑक्टोबरपर्यंत हरकती,सूचना दाखल करण्याचे आवाहन 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.८):-जिल्हापरिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीची तयारी प्रशासनाकडून जोरात सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार याद्यांच्या आधारे तयार करण्यात आलेली प्रारुप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आली आहे.

या संदर्भात नागरिकांना आपल्या नावाबाबत कोणतीही चूक, हरकत किंवा सूचना असल्यास त्या १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत लेखी स्वरूपात संबंधित तहसील कार्यालयात सादर करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) यांनी केले आहे.प्रारुप मतदार याद्या जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, सर्व तहसील कार्यालये आणि पंचायत समिती कार्यालयात सर्वांसाठी पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, स्वतःचे नाव, पत्ता आणि मतदार तपशील नीट तपासून आवश्यक सुधारणा वेळेत नोंदवाव्यात. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकती वा सूचनांवर विचार केला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

No comments