स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई!..दोन गावठी कट्टे आणि आठ जिवंत काडतुसे जप्त अवैध शस्त्र विक्रेता अटक! सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- ह...
स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई!..दोन गावठी कट्टे आणि आठ जिवंत काडतुसे जप्त अवैध शस्त्र विक्रेता अटक!
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.२८) – शनिशिंगणापुर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी एक धडक कारवाई करत गावठी शस्त्र विक्रेत्याला जेरबंद केले. या कारवाईत तब्बल दोन गावठी कट्टे आणि आठ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून आरोपीकडून एकूण 64 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
नेवासा परिसरात गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार पोलिसांनी भारत सोपान कापसे (वय 27, रा. कांगोणी, ता. नेवासा) या तरुणाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दोन गावठी पिस्टल व आठ जिवंत काडतुसे विक्रीसाठी घरात ठेवले असल्याचे कबूल केले. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ छापा टाकून 60,000 रुपयांचे दोन गावठी पिस्टल आणि 4,000 रुपयांची आठ काडतुसे असा मुद्देमाल हस्तगत केला.
या प्रकरणी पोलीस नाईक सोमनाथ झांबरे यांच्या फिर्यादीवरून शनिशिंगणापुर पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्ट कलम 3/25, 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शनिशिंगणापुर पोलिसांकडे सुरू आहे. ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दिपक मेढे व अंमलदार राहुल द्वारके, शाहिद शेख, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, विशाल तनपुरे, भगवान थोरात, रमिझराजा आतार, प्रशांत राठोड आणि महादेव भांड यांच्या पथकाने केली.

No comments