adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्रीचा पर्दाफाश..!पोलिसांची धडक कारवाई;एक जण अटकेत

 जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्रीचा पर्दाफाश..!पोलिसांची धडक कारवाई;एक जण अटकेत  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर ...

 जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्रीचा पर्दाफाश..!पोलिसांची धडक कारवाई;एक जण अटकेत 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.२८):-संगमनेर शहर पोलिसांनी शहरात बेकायदेशीररित्या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका टोळीवर धडक कारवाई करत MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP TERMIVA या नशेच्या औषधाचा मोठा साठा जप्त केला आहे.या कारवाईत पोलिसांनी लाखोंचा मुद्देमाल जप्त करून एकाला ताब्यात घेतले आहे.

💊 गुप्त माहितीवरून पोलिसांची कारवाई

शहरातील एम.आर. व्हिटॅमिन सप्लिमेंट शॉपमधून प्रतिबंधित औषधे विक्री होत असल्याची गुप्त माहिती संगमनेर शहर पोलिस ठाण्याला मिळाली होती.त्यानंतर  पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख मार्गदर्शनाखाली  पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, पोलीस अंमलदार बाबासाहेब सातपुते,पोलीस अंमलदार खुळे, पोलीस अंमलदार क्षीरसागर यांनी सापळा रचून २७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास धाड टाकली.या धाडीत MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP TERMIVA 10 ML हे नशेचे इंजेक्शन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.संबंधित औषधाचा वापर वैद्यकीय उपचाराऐवजी व्यसनासाठी होत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

🧾 जप्त केलेला मुद्देमाल

या कारवाईत पोलिसांनी एकूण २,२३,१२०/- किमतीचा माल जप्त केला आहे.यात खालील वस्तूंचा समावेश आहे :

🚓 संशयित ताब्यात

या प्रकरणात पोलिसांनी आदित्य किशोर गुप्ता (वय २४, रा. साईनगर,ता. संगमनेर) यास ताब्यात घेतले आहे. आरोपीने औषधे विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली असून,त्याच्याकडून पुढील चौकशी सुरु आहे. आरोपीच्या मागे आणखी कोणाचा हात आहे का,याचाही पोलिसांकडून तपास सुरु आहे.

⚖️ पुढील तपास सुरू

अंमली पदार्थ नियंत्रण कायद्यानुसार (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला असून,आरोपी विरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे. संगमनेर पोलिसांच्या या धडक कारवाईने शहरातील अवैध औषध विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

👮‍♂️पोलिसांचे आवाहन

संगमनेर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारची बेकायदेशीर औषध विक्री,ड्रग्ज किंवा व्यसनवर्धक वस्तूंची माहिती मिळाल्यास त्वरित पोलीस ठाण्यात कळवावे. गुप्तता काटेकोरपणे राखली जाईल,असे पोलिसांनी सांगितले आहे.

No comments