सहकार भारती यावल तालुका कार्यकारिणी जाहीर अध्यक्ष पदी महेश गडे उपाध्यक्ष हर्षद महाजन इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फै...
सहकार भारती यावल तालुका कार्यकारिणी जाहीर अध्यक्ष पदी महेश गडे उपाध्यक्ष हर्षद महाजन
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर राष्ट्रीय सहकार भारती चे यावल तालुका कार्यकर्त्यांची बैठक जिल्हा अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांचे अध्यक्षतेखाली सातपुडा पतसंस्था चे सभागृहात पार पडली या सभेत सहकार भारती राष्ट्रीय संपर्क प्रमुख दिलीप रामू पाटील महिला राष्टीय प्रमुख सौ रेवती ताई शेंदूरणीकर यांचे मार्गदर्शनाखाली व सहकार नेते शरद महाजन यांच्या उपस्थितीत यावल तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली सभेत चर्चे अंती सभा अध्यक्ष व जिल्हा सहकार भारती जिल्हा अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी पुढीलप्रमाणे कार्यकारिणी घोषित केली तालुका अध्यक्ष महेश प्रभाकर गडे उपाध्यक्ष राजेंद्र भावडू महाजन मोहराळे उपाध्यक्ष हर्षद खेमचंद महाजन न्हावी सचिव महामंत्री राजेश विलास महाजन फैजपूर कार्यकारिणी सदस्य चंद्रशेखर चौधरी जितेंद्र खाचने विरोदा निखिल चंद्रकांत महाजन किरण ओंकार चौधरी संघटन सचिव काशिनाथ वारके मार्गदर्शक शरद महाजन ऍड राजेश गडे दूध संघ संचालक नितीन चौधरी यांची निवड करण्यात आली असून या माध्यमातून सहकार मजबूत करणे कार्यकर्ते प्रशिक्षित व सुसंस्कारित करणे व सहकाराचा विकास व प्रचार करण्यासाठी सहकार भारती उपक्रम राबवित असल्याचे सविस्तरपणे माहिती जिल्हा अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी अध्यक्षीय भाषणात दिली आभार प्रदर्शन जिल्हा कार्यकारिणी सदस्य धनंजय फिरके यांनी केले सभेस संजय गडे योगेश वाणी यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते नवीन कार्यकारिणी चे नाशिक विभाग प्रमुख शरद जाधव दिलीप अप्पा लोहार जिल्हा उपाध्यक्ष सुधीर आबा पाटील विकास देवकर शोभा ताई पाटील संजय बिर्ला बन्सीलाल अंधुरे शांता ताई वाणी प्रवीण कुडे यांनी अभिनंदन केले आहे.

No comments