रावेर पोलीस स्टेशनचे वतीने "रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धा" पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांनी सहभागी होण्यासाठी नागरिकांना के...
रावेर पोलीस स्टेशनचे वतीने "रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धा"
पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांनी सहभागी होण्यासाठी नागरिकांना केले आवाहन
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जळगांव जिल्हा पोलीस दल रावेर पोलीस स्टेशनचे वतीने दिनांक 31/10/2025 रोजी "रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धा" आयोजित करण्यात आलेली आहे.
"रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धेचा मार्ग रावेर बुर्हानपूर रस्त्यावरील छोरीया मार्केट, रावेर शहर ते रावेर रेल्वे स्टेशन असा राहणार आहे. ही स्पर्धा रावेर पोलीस स्टेशन तर्फे आयोजित करण्यात आलेली आहे. ज्यांना ह्या स्पर्धेत सहभागी व्हायच असेल त्यांनी दिनांक 31/10/2025 रोजी सकाळी 06.30 वाजता छोरीया मार्केट, रावेर येथे शक्य झाले तर पांढरा टीशर्ट व ट्रॅक पॅन्ट परिधान करून उपस्थित राहावे. असे आवाहन रावेर पोलीस स्टेशनचे वतीने पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांनी केले आहे

No comments