adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा नगरपरिषदेमार्फत भव्य वृक्ष लागवड कार्यक्रम

  चोपडा नगरपरिषदेमार्फत भव्य वृक्ष लागवड कार्यक्रम   चोपडा प्रतिनिधी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा नगरपरिषद ही माझी वसुंधरा, स्वच्छ सर...

 चोपडा नगरपरिषदेमार्फत भव्य वृक्ष लागवड कार्यक्रम  


चोपडा प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा नगरपरिषद ही माझी वसुंधरा, स्वच्छ सर्वेक्षण २०२५ यांची प्रभावी अंमलबजावणी करीत आहे. या अनुषंगाने नगरपरिषद ही विविध निकषांची पुर्तता करीत आहे. चोपडा नगरपरिषद तर्फे चोपडा नगरपरिषद ही माझी वसुंधरा ६.०,स्वच्छ सर्वेक्षण २०२५ यांची प्रभावी अंमलबजावणी करीत आहे. चोपडा नगरपरिषद व श्रीराम नगर कॉलनी परिसरातील नागरीक यांच्या संयुक्त विद्यमानाने दि.२९/१०/२०२५ रोजी भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन चोपडा नगरपरिषद मा.मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.पर्यावरण संवर्धन,हरितक्रांती व स्वच्छ चोपडा अभियानाच्या उपक्रमांतर्गत दिनांक दि.२९/१०/२०२५ रोजी नगरपरिषद चोपडा यांच्या वतीने भव्य वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला.


या कार्यक्रमात मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.या वेळी मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी कार्यक्रमाप्रसंगी की, चोपडा शहरास हरित व नंदनवन करायचं असेल तर प्रत्येक नागरीकाने प्रत्येकी १ झाड लावुन वसुंधरा व पर्यावरण संरक्षणास सहकार्य करावे. तसेच केवळ झाड न लावता त्याचे योग्य संगोपण व संवर्धन करावे जेणेकरुन पर्यावरणाची हानी होणार नाही. असे प्रतिपादन केले. तसेच कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित नागरीकांनी संपुर्ण सहकार्य करण्याची आश्वासन दिले. भव्य वृक्ष लागवड कार्यक्रमात परिसरातील नागरीक माजी नगरसेवक महिला वर्ग, विद्यार्थी यांचा सहभागाने पार पाडला. यावेळेस कार्यक्रमाप्रसंगी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज असून प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड लावावे व त्याचे संगोपन करावे, अशी शपथ घेण्यात आली.  कार्यक्रमाअंतर्गत सुमारे १०० झाडे लावण्यात आली असून झाडांचे नियमित पालनपोषण करण्याची जबाबदारी संबंधित कॉलनी परिसरातील नागरीकांनी स्वीकारली आहे. यात वड, पिंपळ, कडुनिंब, चाफा, गुलमोहन, अशोकवृक्ष या वृक्षांचा समावेश होता. कार्यक्रमात “सासे हो रहि हे कम, आवो पेड लगाये हम” या ब्रिद वाक्याने कार्यक्रमाची सांगता झाली. नगरपरिषद चोपडाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, “एक व्यक्ती - एक झाड” या संकल्पनेत सहभागी व्हा व हरित, स्वच्छ आणि सुंदर चोपडा घडविण्यास हातभार लावा.चोपडा नगरपरिषदेतील स्वच्छता निरिक्षक  दिपाली साळुंके यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावित केले.या कार्यक्रमाकरीता स्वच्छता निरिक्षक दिपाली साळुंके, कमलेश पाटील,भरत देशमुख,योगेश शिरसाठ यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमात उपमुख्याकारी संजय मिसर, पा.पु. अभियंता,जितेंद्र मोरे, विद्युत अभियंता प्रमोद पाटील, लेखापाल मयुर शर्मा, भारती पाटील, स्वच्छता निरिक्षक वसंत राठोड, दिपाली साळुंके, शहर समन्वयक स्वप्निल धनगर, विजय करणकाळ,भास्कर पाटील,दिगबर पाटील,कैलास राणे, पुंडलिक मराठे, कैलाश मराठे, दीपक मराठे, शशिकांत चौधरी, किशोर ठाकरे, आदी श्रीराम नगर रहिवासी व महिलावर्ग चोपडा न.प.चे मुकादम व मदतनीस उपस्थित होते.

No comments