मनाचं आरोग्य सांभाळा, प्रत्येक दिवस मोलाचा.. प्रा .डॉ. प्रतिभा ढाके सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मुक्ताईनगर :-समता...
मनाचं आरोग्य सांभाळा, प्रत्येक दिवस मोलाचा.. प्रा .डॉ. प्रतिभा ढाके
सतिश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर :-समता फाउंडेशन मुक्ताईनगर चे फॅशन डिझायनिंग वर्गात 10 ऑक्टोबर जागतिक "मानसिक आरोग्य दिन" साजरा करण्यात आला .
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक मा. श्री .व्ही. के. वळस्कर यांनी कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्याता श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालयाच्या क्रीडा संचालिका व योगशिक्षिका प्रा .डॉ. प्रतिभा ढाके यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात डॉ.प्रतिभा यांनी मानसिक आरोग्याची व्याख्या सांगून ,मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमित व्यायाम, योग- ध्यान ,नियमित व पुरेशी झोप ,सकारात्मक विचार, आपले मन मोकळे करणे, छंद जोपासणे, तणाव व्यवस्थापन करणे ,आरोग्यदायी आहार घेणे, डिजीटल डिटॉक्स होणे, मानसोपचार तज्ञांचा सल्ला घे ऊन "मनाचे आरोग्य सांभाळा, कारण प्रत्येक दिवस मोलाचा आहे" असे प्रतिपादन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात मा.वळस्कर यांनी जागतिक मानसिक आरोग्य निमित्त शुभेच्छा देऊन मानसिक आरोग्य किती महत्त्वाचे आहे हे उदाहरण दाखल स्पष्ट केले. कार्यक्रमाचे आयोजन टिम ट्रेनर सौ. आशा तडवी यांच्या मार्गदर्शनात झाले. सूत्रसंचालन एफ. डी ट्रेनर गीता भोई यांनी केले.तर आभार सौ.हर्षदा दैवे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समता फाउंडेशनच्या फॅशन डिझायनिंगच्या महिला यांनी परिश्रम घेतले.
No comments