फैजपूर येथे धनाजी नाना महाविद्यालय सरदार १५० व आत्मनिर्भर भारत शपथ समारंभ उत्साहात संपन्न इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...
फैजपूर येथे धनाजी नाना महाविद्यालय सरदार १५० व आत्मनिर्भर भारत शपथ समारंभ उत्साहात संपन्न
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धनाजी नाना महाविद्यालय फैजपूरच्या एनएसएस विभागाच्या वतीने सरदार वल्लभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने पहिले पर्व ६ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ठीक दहा वाजता राष्ट्रीय निबंध प्रतियोगिता सरदारजी १५० चे आयोजन करण्यात आले होते. त्यासोबतच एनएसएसच्या सर्व स्वयंसेवकांना आत्मनिर्भर भारतची शपथ देण्यात आली. एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सतीश पाटील यांनी एनएसएसच्या स्वयंसेवकांना आत्मनिर्भर भारतची शपथ दिली. प्रसंगी महाविद्यालयातील एनएसएसचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन करण्यासाठी अश्विनी पवार, रोहिणी माळी, कीर्ती महाजन, देविका पाटील, यश वाणी, श्वेता भालेराव, प्रेरणा भालेराव,दीक्षा वानखेडे व सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
No comments