adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्यामुळे हिंदी भाषेचे कार्य विश्व पटलावर - डॉ मधु खराटे

  बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्यामुळे हिंदी भाषेचे कार्य विश्व पटलावर - डॉ मधु खराटे  इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) हिंद...

 बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्यामुळे हिंदी भाषेचे कार्य विश्व पटलावर - डॉ मधु खराटे 


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळवून देण्यात व विश्व पटलावर प्रस्तुत करण्यात हिंदी राष्ट्रभाषा प्रचार व प्रसार समिती, वर्धा चे अध्यक्ष बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांचे कार्य अतुलनीय आहे. राजकारणातील नीतीने समाजकारण करणारे आदर्श राजकारणी म्हणून बाळासाहेबांकडे आदराने बघितले जाते. यासोबतच हिंदी भाषेचे महत्व जाणून राष्ट्रभाषा सोबतच विश्वभाषा पर्यंत हिंदीला पोहोचविणारे महामेरू म्हणजेच बाळासाहेब मधुकरराव चौधरी असे गौरवोद्गार डॉ मधु खराटे यांनी काढलेत. ते तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या वतीने आयोजित हिंदी सप्ताहाच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे यांच्यासहित हिंदी विभाग प्रमुख प्रा डॉ कल्पना पाटील, प्रा डॉ ईश्वर ठाकूर, प्रा डॉ सतीश पाटील, प्रा डॉ विजय सोनजे, प्रा जगदीश खरात, प्रा डॉ विजय तायडे, प्रा डॉ सीमा बारी, प्रा पंकज बोदडे, प्रा धीरज खैरे यांच्यासहित विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हिंदी भाषेचे महत्व अधोरेखित करतानाच हिंदी भाषेसाठी महाराष्ट्रसहित उत्तर व पूर्व भारतात बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे यांनी हिंदी विभागाच्या वतीने आयोजित हिंदी सप्ताहाच्या अनुषंगाने विविध स्पर्धा च्या आयोजनाचे कौतुक करीत हा उपक्रम असाच निरंतर सुरू ठेवावा व विद्यार्थ्यांनी त्यांच्या अंगी असल्यास सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे अशी आशा व्यक्त केली. यावेळी हिंदी विभागाच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमांचा अनुभव मनोगतातून ओमसिंग राजपूत व छाया शिरसाळे या विद्यार्थ्यांनी व्यक्त करीत विभागाचे आभार मानून या विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यासपीठ लाभले असून यामुळे आत्मविश्वासासोबतच विविध कौशल्य विकसित झाल्याचे मनोगत व्यक्त केले. या हिंदी सप्ताहाच्या अनुषंगाने विविध स्पर्धा मधील विजेते स्पर्धकांचे बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. त्यात रांगोळी स्पर्धा

प्रथम ईश्वरी नेमाडे द्वितीय श्वेता पवार तृतीय इशिता पाटील उत्तेजनार्थ लीना गाजरे काव्यवाचन स्पर्धा प्रथम यश महाजन द्वितीय छाया शिरसाळे तृतीय दुर्गेश्वरी महाजन उत्तेजनार्थ अश्विनी पवार निबंध स्पर्धेतप्रथम लूतुजा भंगाळे द्वितीय जान्हवी जावळे तृतीय नयना पाटील उत्तेजनार्थ संयोगिता राजपूतमेहंदी स्पर्धा प्रथम डिंपल सरोदे द्वितीय सानिया शेख तृतीय दीक्षा बोंडे उत्तेजनार्थ भुवनेश्वर चौधरी चित्रकला स्पर्धा प्रथम वैभव भालेराव द्वितीय घोषणा पाटील तृतीय ममता सावकारे उत्तेजनार्थ वैशाली सुतार 

जनरल नॉलेज स्पर्धा प्रथम प्रियांका भालेराव द्वितीय सैय्यद फातिमा 

तृतीय हेमंत येवले वक्तृत्व स्पर्धा प्रथम छाया शिरसाळे द्वितीय गुंजन जैन 

तृतीय अश्विनी पवार व ओमसिंग राजपूत आणि उत्तेजनार्थ आर्यन कोळी या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ विजय सोनजे व उज्वला पाटील यांनी केले तर आभार डॉ सतीश पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष श्री शिरीषदादा चौधरी व सर्व सन्माननीय संस्था पदाधिकारी यांचे मार्गदर्शन व शुभेच्छा लाभल्यात तर प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन व परिश्रम घेतले.

No comments