adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा :-- राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अरीज बेग मिर्झा चोपडा येथे काँग्रेस पक्षाची आढावा बैठक.

  स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा :-- राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अरीज बेग मिर्झा चोपडा येथे काँग्रे...

 स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा :-- राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अरीज बेग मिर्झा

चोपडा येथे काँग्रेस पक्षाची आढावा बैठक.


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पक्ष सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांचा काही फायदा होत नाही.जिल्ह्यात विकास करायला वाव आहे.त्या दृष्टीने प्रयत्न करावा.

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये कुणाशी युती करावी अथवा करू नये याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा असे मत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय) पक्षाचे जळगाव जिल्ह्याचे प्रभारी अरीज बेग मिर्झा यांनी केले.

 चोपडा तालुका व शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय) कमिटीच्या वतीने दिनांक-25 रोजी जिल्हा परिषद,पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकी संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.


  यावेळी व्यासपीठावर माजी आमदार शिरीष चौधरी,चोपडा काँग्रेसचे प्रभारी संजय उमरकर,सुबोध गिरे,महाराष्ट्र

प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष ॲड संदीप पाटील, सुरेश पाटील,अजबराव पाटील ,के डी चौधरी आदी उपस्थित होते.

यावेळी चोपडा तालुका काँग्रेस निरीक्षक  संजय उमरकर म्हणाले की,येणाऱ्या काळात लढाई मतांची नसून ती विश्वासाची आहे.आपण पक्षाला काही तरी देणं लागतो ते ओंजळी भरून द्या.

अनेक मोठ मोठे नेते काँग्रेस संपवायला निघाले होते आता त्यांचे काय हाल आहेत.ते आपण पाहत आहोत.सोबत घ्या किंवा एकट्याने लढायचे हा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यायचा आहे.

नगरपालिका प्रभाग निहाय बैठका घ्याव्यात.आता मला जबाबदारी दिली आहे ती सर्वजण मिळून पूर्ण करु या असे सूचित केले.

तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ॲड संदीप पाटील म्हणाले की,

काँग्रेस पक्षात विश्वासू कार्यकर्ते आहेत. तालुका पातळीवरील गेल्या एक महिन्यापासून नियोजन सुरू आहे.पक्ष मोठा असल्याने तयारी सुरु आहे.नगरपालिकेत ही प्रभाग निहाय तयारी केली आहे. सत्ता येते जाते तो विषय वेगळा आहे.मतदारांमध्ये प्रचंड संभ्रम आहे.जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका यामध्ये आपल्याला चांगले यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी

पंचायत समिती माजी सभापती प्रमोद पाटील, अशोक साळुंखे आदींनी मनोगत व्यक्त केले.

या बैठकीस चोसाका उपाध्यक्ष शिवाजी देसले, संचालक गोपाळ धनगर,माजी नगरसेविका फातिमाताई पठाण,तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे,

शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे,राजेंद्र पाटील, मधुकर  बाविस्कर ,वजाहत काझी , डॉ. बी आर पाटील , शांताराम लोहार, यशवंत खैरनार, लक्ष्मण काविरे,देविदास साळुंखे,संजय शिंदे,अरिफ सिद्दिकी, पृथ्वीराज सैंदाणे, गोपाल घनगर चोसाका संचालक, विकास पाटील, देविदास धनगर, प्रताप सोनवणे, जुनेद खान पठाण, विजय पाटील, दारासिंग बारीला, मोमीन रमजान, ज्ञानसिंग पावरा, शर्मा पावरा, रामदास पावरा, मुकेश पावरा, श्रीराम गायकवाड, विशाल भाडले, समाधान पावरा, किशोर पाटील, प्रवीण पाटील, शेख आरिफ सय्यद, अहमद शेख फरदीन ,आरिफ मन्यार, मन्यार खान ,अब्दुल शेख,शाहीर अली, जहीर शेख, अरिफ सिद्दिकी, अनिल पाटील, मोहन पाटील, चंदू पाटील, जितेंद्र पाटील, शैलेश कुमार वाघ,मयूर पाटील, देवानंद पाटील, संजय पाटील, राहुल साळुंखे, गोविंदा महाजन,अशोक साळुंखे, राजेश राठोड,अविनाश पाटील,माणिक पाटील, प्रमोद पाटील, भानुदास पाटील,दिलीप पाटील यांच्या सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments