हिंगोणा–सावखेडा गटात अनु.जमाती आरक्षण – मीना राजू तडवी प्रबळ दावेदार म्हणून समोर यावल प्रतिनिधी : (संपादक -:- हेमकांत गायकवाड) हिंगोणा–सा...
हिंगोणा–सावखेडा गटात अनु.जमाती आरक्षण – मीना राजू तडवी प्रबळ दावेदार म्हणून समोर
यावल प्रतिनिधी :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
हिंगोणा–सावखेडा जि.प. गट यंदा अनु.जमाती (ST) प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानंतर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय उत्साहात झळाळ निर्माण झाला आहे. या गटातून सौ. मीनाताई राजू तडवी या प्रबळ दावेदार म्हणून चर्चेत असून, त्यांचा प्रभावी जनसंपर्क आणि सामाजिक कामकाजामुळे स्थानिक जनता त्यांना पसंती देण्याच्या दृष्टीने सकारात्मक आहे.
सौ. मीना तडवी गेल्या काही वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि स्थानिक विकासकामांमध्ये सक्रिय आहेत. महिलांच्या स्व-सहायता गटांद्वारे ग्रामीण महिलांना स्वावलंबी बनविण्याचे कार्य त्यांनी केले असून, गावातील पाणीपुरवठा, रस्ते, शाळा विकास आणि स्वच्छता अभियान यांसारख्या मूलभूत सुविधांवर सातत्याने पाठपुरावा करत लोकांचा विश्वास मिळवला आहे.
गावातील तरुण वर्ग आणि महिलांमध्ये त्यांचा व्यापक संपर्क असल्यामुळे त्यांना ठळक जनाधार लाभला आहे. त्यामुळे हिंगोणा–सावखेडा गटात मीना तडवी या आगामी निवडणुकीत प्रभावी आणि स्पर्धात्मक उमेदवार ठरण्याची शक्यता आहे.
सौ. मीना तडवी म्हणाल्या, “जिल्हा परिषद निवडणूक लढण्याची मला पक्षाकडून संधी मिळाल्यास, मी जनतेची सेवा करण्याचा आणि विकासकामांना गती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन.” सौ. मीनाताई राजू तडवी यांचे भूषवलेले पदे: प्रथम लोकनियुक्त सरपंच, परसाडे बु. माजी पंचायत समिती सदस्य, दहिगाव गण,प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश अनु.जमाती मोर्चा, महाराष्ट्र. सौ. मीनाताई तडवी उच्चशिक्षित असून, समाजसेवा आणि विकासकामांमध्ये विशेष अनुभव घेतलेला आहे.
No comments