रोटरी क्लब तर्फे थेपडे विद्यालयात पुस्तके वाटप जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील (संपादक -:- हेमकांत गायकवाड) म्हसावदः स्वा सै...
रोटरी क्लब तर्फे थेपडे विद्यालयात पुस्तके वाटप
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
म्हसावदः स्वा सै पं ध थेपडे विद्यालयात रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष श्री गिरीष कुलकर्णी,मानद सचिव श्री सुभाष भाऊ अमळनेरकर, ज्येष्ठ रोटेरियन श्री योगेश दादा गांधी, रोटरी सदस्य श्री रितेश जैन, विद्यालयाचे माजी विद्यार्थी मकरंद कुलकर्णी यांचे सर्वप्रथम विद्यालयाचे प्राचार्य श्री पी डी चौधरी सर, उपप्राचार्य जी डी बच्छाव सर, पर्यवेक्षक श्री के पी पाटील सर यांच्या शुभहस्ते स्वागत करण्यात आले.
श्री गिरीष कुलकर्णी यांनी पुस्तक वाचनाचे महत्त्व विशद केले .तसेच रोटरी क्लब याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कार वाढवावे यासाठी त्यांनी स्वलिखित संकल्प चांगला माणूस बनण्याचा हे पुस्तक इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना रोटरी क्लबच्या संपूर्ण टीम मार्फत वितरण करण्यात आले . याप्रसंगी विद्यालयाचे सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस जे पवार सर व छायाचित्र श्री डी एम सोनवणे सर यांनी केले
No comments